Lok Sabha Election 2024 : नाशिकबाबत महायुतीत घोळ कायम; तर महाविकास आघाडीचा 'असा' फॉर्म्युला

Nashik Lok Sabha Constituency : विद्यमान फॉर्म्युल्यानुसार महायुतीत नाशिक शिवसेनेकडे असतानाही भाजपचा डोळा तर राष्ट्रवादी काँग्रेसचाही दावा
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News : नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर दिंडोरीमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे जवळपास स्पष्ट झाले. महायुतीचे भिजत घोंगडे मात्र कायम असून, नाशिक लोकसभा कोणत्या पक्षाकडे जाणार याबाबतचे तर्कवितर्क अद्याप थांबलेले नाहीत. विशेषत: नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत भाजप आग्रही आहे. त्यामुळे महायुतीत हे मतदारसंघ कुणाकडे जाणार, याची उत्सुकता आहे. (Lok Sabha Election 2024)

भाजप हा नाशिक (Nashik) लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात तर भाजपने काम देखील सुरू केले आहे. हा पारंपारीक मतदारसंघात काम करताना भाजपने आपला मोर्चा नाशिककडे वळवला आहे. पदाधिकाऱ्यांकडून तशी मागणी पुढे आलेली आहे. यामुळे महायुतीचे चित्र अद्याप स्पष्ट होताना दिसत नसल्याने तेढ वाढला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Sharad Pawar News : शरद पवार करणार महादेव जानकरांशी तह? बारामतीसाठी 'अशी' असणार रणनीती

महाआघाडीने दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी 9 मार्च रोजी शरद पवारांची (Sharad Pawar) बैठक आहे. तत्पुर्वीच रविवारी शिवसेनेचे संजय राऊतांनी नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. नाशिक लोकसभा निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच (Uddhav Thackeray) लढवत असून, समन्वयक विजय करंजकर हे शिवसेनेचे उमेदवार असतील, असा स्पष्ट सूचना करंजकरांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. आघाडीचे नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होत असताना महायुतीचे घोडे मात्र नाशिकच्या जागेवर अद्याप अडले आहे. हा मतदारसंघ भाजपला हवा आहे. शिवसेना (शिंदे गट) सुद्धा या जागेसाठी आग्रही असून, राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपला दावा अद्याप सोडलेला नाही.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Subhash Bhamre : सुभाष भामरेंची उमेदवारी अडचणीत; धुळे मतदारसंघाबाबत भाजपचा रिपोर्ट काय ?

भाजपने दिंडोरी मतदारसंघात पक्षीय पातळीवर लक्ष केंद्रीत केले. मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे दिंडोरीची पारंपारीक जागा भाजप सोडणार याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे तीर्थक्षेत्राचा विकास आणि धार्मिक पर्यटन या मुद्द्यांवर नाशिकची जागा भाजपला मिळणार का, हा महत्वाचा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारीत नाशिक दौरा केला. त्यावेळी नाशिकमधून मोदी लढतील, अशा चर्चा सुरू होत्या. भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर त्या फोल ठरल्या आहेत.

आता भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष नाशिक लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. येथून भाजपच्या इच्छुकांची मोठी रांग लागली आहे. मात्र ही जागा भाजपला (BJP) मिळाल्यास जिल्ह्याच्या केंद्रातील राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फारसा वाव मिळणार नाही, अशी चर्चा सुरू आहे. भाजपचे लक्ष आता वरिष्ठ नेत्यांकडे लागले असून, महायुतीतील जागा वाटपाचा घोळ कधी संपणार, आणि ही जागा कुणाच्या पारड्यात पडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Raj Thackeray : उमेदवार ठरणार होता पण राज ठाकरेंनी थेट मुंबईच गाठली; पुण्यात नेमकं काय घडलं ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com