Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत 10 पैकी 8 जागा जिंकत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सर्वात जास्त 80 टक्क्यांच्या स्ट्राइक रेटने दणदणीत कामगिरी केली आहे. लोकसभा निवडणुकीतील या सक्सेसची परंपरा यापुढेही कायम राहणार असल्याचा विश्वास शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही पाटलांनी सांगितले.
शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद सधाला. त्यावेळी त्यांनी आता ध्येय विधानसभा निवडणुकीचे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीने लोकसभेत सत्ताधारी पक्षाला धूळ चारत 30 जागा जिंकल्या आहेत. त्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी पायाला भिंगरी बांधली होती. आमच्या पक्षाने 10 पैकी 8 जागा जिंकल्या आहेत. आता राज्यात 2024 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आणायचे हे ध्येय ठेवून आम्ही काम करत आहोत, असे पाटलांनी स्पष्ट केले.
राज्यात आगामी सरकार महाविकास आघाडीचे असणार, हे जयंत पाटलांनी पटवूनही देण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत फिरताना केंद्रापेक्षा राज्यातील सरकारबाबत जनतेते प्रचंड नाराजी असल्याचे जाणवले. विधानसभेचे नाव काढले तरी 67 टक्क्यांहून अधिक लोकांत राज्याबाबत नाराजी समोर आले. त्यामुळे त्यांना विधानसभेत जास्त फटका बसणार आहे, असा दावाच पाटलांनी करून राज्यात आघाडीचेच सरकार येणार असल्याचा दावा केला.
लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी अपप्रचार केल्याचा दावा केला जात आहे. ही बाब पाटलांनी थेट फेटाळून लावत राज्य सरकारवर निशाणा साधला. भाजपचे काही मंत्र्यांनी संविधान बदलण्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यातच महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्याचे प्रश्न, जीएसटी आदी प्रश्नांचा विचार लोकांनी केला आहे. यातूनच सत्ताधाऱ्यांना फटका बसला आहे, असेही पाटलांनी स्पष्ट केले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.