Jayant Patil : आता आमचा पक्ष स्वच्छ झाला; जयंत पाटलांचा रोख कुणाकडे?

Lok Sabha Election 2024 Result Sharad Pawar NCP : लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी 10 जागा लढवल्या. बारामतीतून सुप्रिया सुळे आणि शिरूरमधील अमोल कोल्हे सोडले तर इतर सर्व नवे चेहरे पवारांनी दिले होते. त्यातील आठ जणांचा विजय झाला आहे.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि अजित पवारांसह 40 हून आमदार आणि एका खासदाराने ज्येष्ठ नेते शरद पवारांची साथ सोडली. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने 10 पैकी 8 जागा जिंकल्या. त्यात अनेक नवख्या खासदारांचा समावेश आहे. या खासदारांचे शरद पवारांच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यावेळी आता आमचा पक्ष स्वच्छ झाल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे पाटलांचा नेमका रोख कुणाकडे होता, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी 10 जागा लढवल्या. बारामतीतून सुप्रिया सुळे आणि शिरूरमधील अमोल कोल्हे सोडले तर इतर सर्व नवे चेहरे पवारांनी दिले होते. त्यातील आठ जणांचा विजय झाला आहे. तर काही ठिकाणी चिन्हसाधर्म्याचा फटका बसल्याचे आता स्पष्ट होत आहे. पक्षाच्या वतीने या खासदारांचे अभिनंदन करण्यात आले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी आमचा पक्ष स्वच्छ झाल्याचे विधान केले.

पाटील म्हणाले, पवारांनी आपल्या राजकीय जीवनात नेहमीच तरुणांना मोठे करण्याचे काम केले आहे. नव्या, स्पॉटलेस युवकांना राजकारणात मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. आताही बहुतांश खासदार पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. यापुढेही नवख्या तरुणांना संधी दिली जाणार आहे. आता आमचा पक्ष स्वच्छ झाला आहे.

तुतारी आणि पिपाणी या चिन्हांमध्ये गफलत झाल्याचा फटका बसल्याचेही पाटलांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, निवडून आलेल्या आमच्या खासदारांची 45 ते 50 हजार मते पिपाणी चिन्हाला गेली आहेत. एकट्या दिंडोरीत पिपाणीमुळे भगरेंना तब्बल 1 लाख 3 हजार मतांचा फटका बसला आहे. साताऱ्याची सीट 32 हजारांनी पडली आहे. तेथे पिपाणीला 37 हजार मते पडलेली आहेत. याबाबत निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत. यापूर्वीही आम्ही आक्षेप घेतला होता, याकडेही पाटलांनी लक्ष वेधले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com