Murlidhar Mohol Meet Raj Thackeray  Sarkarnama
मुंबई

Video Raj Thackeray : मुरलीधर मोहोळांनी घेतली राज ठाकरेंची भेट; काय आहे कारण?

Minister Murlidhar Mohol Meets MNS Chief Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीस बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यातून त्यांनी चार सभा घेतल्या. ते चारही खासदार निवडून आलेले आहेत.

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : पुण्याचे नवनिर्वाचित खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी ठाकरेंचे आभार मानले. तर राज यांनी त्यांना वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी Raj Thackeray महायुतीस बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यातून त्यांनी चार सभा घेतल्या. ते चारही खासदार निवडून आलेले आहेत. यात पुण्याचाही समावेश आहे. आता मोहोळ खासदार झाले आहेत. पहिल्याच टर्ममध्ये त्यांना मोदी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री पदाचीही जबाबदारी मिळाली आहे.

मोहोळ Murlidhar Mohol यांनी आपल्या कामास सुरूवात केलेली आहे. त्यातून त्यांनी वेळ काढून शुक्रवारी रात्री राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाल्या. ठाकरेंनी अभिनंदन करत मोहोळ यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर मोहोळांनीही राज ठाकरेंचे आभार मानले.

याबाबत मोहोळ यांनी आपल्या सोशल मीडियाच्या अधिकृत हँडलवर राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती दिली आहे. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबई येथील शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. तसेच त्यांचे धन्यवाद व्यक्त केले. त्यांनी पुढील वाटचालीस दिलेल्या शुभेच्छाही स्विकारल्या, असे नमूद केले आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत मोहोळांना शहरातील समस्यांची जाणीव करून दिली होती. मुंबईचा विनाश होण्यास काळ लोटला तर नियोजनाविना पुण्याचाही नाश होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. तसेच पुण्यातील प्रदुषीत नद्या, दळणवळ याकडे लक्ष देण्याचेही आवाहन राज ठाकरेंनी मोहोळांना केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT