Maharashtra Political News : मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, यासाठी राज्यात आंदोलन सुरू आहे. या मागणीला ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी जाहीरपणे विरोध करताना दिसत आहे.
यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांचे राजकीय कारकीर्द संपवण्याचा इशारा दिला होता. मात्र हे कोणा एकट्या दुकट्याचे काम नाही, असे म्हणत भुजबळांनी एक प्रकारे जरांगे पाटलांचं चॅलेंज स्वीकारले आहे.
मराठ्यांना आरक्षण देण्याच्या विरोधात जालन्यातली वडीगोद्री या गावी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन नऊ दिवसांपासून सुरू आहे. यावरून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाल्याचे चित्र आहे.
ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ओबीसी नेते छगन भुजबळांनी जाहीरपणे जरांगे पाटलांचे चॅलेंज स्वीकारले.
मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यात जे कोणी आडकाठी आणतील त्यांच्या पाच पिढ्या राजकारणातून बाद करू, असे आव्हान यापूर्वी जरांगे पाटील यांनी केले होते. तसेच छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांचीही राजकीय कारकीर्द संपवण्याची भाषा त्यांनी केली होती.
त्यावर छेडले असता भुजबळांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, मी ओबीसींचा नेता आहे. माझे राजकीय कारकीर्द संपवण्याचे काम कुणा एकाद - दुसऱ्याचे काम नाही. माझे राजकारण संपवायचे की नाही हे जनता ठरवेल.
दरम्यान, सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यास उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंनी नकार दिला आहे. त्यावर भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या बैठकीत उद्या वडीगोद्री आणि पुणे येथे मंत्रिमंडळातील लोक जणार आहेत. तेथील उपोषणकर्त्यांना आंदोलन थांबवण्याची विनंती करणार आहोत. मी ओबीसींचा लीडर आहे. त्यामुळे मी घेऊन जाणाऱ्या निरोपास ते मान्यता देतील, असा विश्वासही भुजबळांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.