congress  sarkarnama
मुंबई

Congress In Maharashtra : विधान परिषद काँग्रेसला भोवली, पक्षात फूट दिसली; नाराज आमदारांची इतरत्र चाचपणी...

Pradeep Pendhare

Congress News : विधान परिषद निवडणुकीमधील मतं फुटीवरून महाविकास आघाडीमध्ये घमासान सुरू आहे. मत फुटीवरून काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत. वरिष्ठ नेत्यांकडून गद्दारांवर कारवाईचा वारंवार इशारा देण्यात येत असल्याने ते एका बाजूला दिसतात. तर मत फुटल्याचा आरोप असणारे संशयित आमदार दुसऱ्या बाजूला झालेत.

ही दोन्ही गट एकमेकांकडे बोट करत असून, आमदारांनी महाराष्ट्रातील पक्ष नेतृत्वाला आत्मचिंतन करण्याचा सल्ला देत आहेत. तसेच नाराज असलेल्या आमदारांनी इतरत्र चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील नाराज गट विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वेगळी भूमिका घेण्याच्या तयारी दिसतो.

विधान परिषद निवडणूक चुरशीची झाली. या निवडणुकीत महायुतीची नऊच्या नऊ उमेदवार निवडून आले. महाविकास आघाडी सुरवातीपासून आमचे तीन उमेदवार निवडून येणार, असा दावा करत होती. परंतु शरद पवार (Sharad Pawar) यांनी जबाबदारी घेतलेले जयंत पाटील यांचा पराभव झाला. हा पराभव शरद पवार यांच्या देखील जिव्हारी लागलाय. शरद पवार निवडणुकाचा घोषवारा घेत आहेत.

परंतु काँग्रेसची मते या निवडणुकीत फुटल्याचे समोर आले. तेव्हापासून काँग्रेसमध्ये वाद उफाळत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण यांनी मत फुटलेल्या संशयितांवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतचा हायकमांडकडे अहवाल सादर देखील करण्यात आला असून कधीही कारवाई होऊ शकते, असे स्थिती दिसते.

वरिष्ठ नेते हायकमांडच्या संपर्कात असले, तरी नाराज आणि संशयित आमदार देखील महाराष्ट्रातील पक्ष नेतृत्वावर नाराज दिसतात. पक्ष नेतृत्वावरच शंका उपस्थित करत आहेत. झिशान सिद्दिकी यांनी देखील पक्ष नेतृत्वाला आत्मचिंतनाचा सल्ला देत काँग्रेस (Congress) आमदार का नाराज आहेत, याची तपासणी करा, असा सल्ला दिलाय. त्यामुळे झिशान सिद्दिकी काँग्रेसमध्ये असले, तरी ते नाराज आहेत. त्यांचे वडील बाबा सिद्दिकी यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. महायुती निवडून आल्यानंतर राज्यात ओनली अजितदादा, अशी प्रतिक्रिया दिली होती.

काँग्रेसमधील नाराज गट भलत्याच भूमिकेत दिसतोय. हा गट निर्णायक भूमिका घेण्याच्या तयारीत दिसत आहे. इतरत्र चाचपणी करत आहेत. विधान परिषद निवडणुकीमुळे काँग्रेस फुटून दोन गट पडले आहेत. काँग्रेसची सात मतं फुटल्याचा आरोप होतोय. काँग्रेस हायकमांड गद्दारांवर कारवाईच्या तयारीत आहे. मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यावरून ही चर्चा रंगली. विश्वासार्ह आमदारांची मतं वळविण्याचा शिवसेना ठाकरे पक्षाचा आग्रही होता. दरम्यान, फुटीर आमदारांना ट्रकभरून पैसा दिल्याचा आरोप क्रॉस वोटिंगवरून संजय राऊत यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT