Rituja Latke
Rituja Latke  Sarkarnama
मुंबई

अंधेरीतील विजयानंतर ऋतुजा लटकेंचा भाजपवर गंभीर आरोप

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : अंधेरी (Andheri) पोटनिवडणुकीतील (By Election) हा विजय माझा नसून माझे पती रमेश लटके (Ramesh Latke) यांचा आहे. त्यांनी संपूर्ण राजकीय कारकिर्दीत जनसेवा आणि विकास कामेच केली आहेत. त्याची पोचपावती म्हणजेच अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतील माझा विजय आहे, अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके (Rituja Latke) यांनी विजयानंतर दिली.

दरम्यान, पोटनिवडणुकीतून भाजपकडून जरी उमेदवार मागे घेतला असला तरी त्यांच्याकडून लोकांना नोटापुढचे बटण दाबण्याबाबत सांगण्यात आले, त्याबाबतचे व्हिडिओही सोशल मीडियातून व्हायरल झाले आहेत, असा आरोपही लटके यांनी केला. (After victory in Andheri, Rituja Latke made a serious accusation against BJP)

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ६६ हजार २४७ मते मिळवत विजय नोंदवला. या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे नोटाला दुसऱ्या क्रमांकाची १२ हजार ७७६ मते मिळाली आहेत. त्यामुळे नोटासंदर्भात विविध आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. नोटासंदर्भात आम्ही निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार केली हेाती. मात्र, त्यावर पुढे काहीही झालेले नाही, असे आमदार अनिल परब यांनी स्पष्ट केले.

भाजपकडून उमेदवार मागे घेतला असला तरी त्यांच्याकडून मतदारांना नोटापुढील बटण दाबण्याबाबत सांगण्यात आले. त्याबाबतचे व्हिडिओही सोशल मीडियातून व्हायरल झाले आहेत. नोटाचा प्रचार होत नसतो. जेव्हा कुठलाही पक्ष तुम्हाला मान्य नाही, तेव्हा नोटा हे बटण दाबले जाते, त्यामुळे ही जबाबदारी मतदात्यांची होती, असेही लटके म्हणाल्या.

ऋतुजा लटके म्हणाल्या की, मी सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानते. सर्वप्रथम आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि अंधेरी पोटनिवडणुकीची संपूर्ण जबाबदारी एकहाती सांभाळणारे अनिल परब या सर्वांचे मी आभार मानते. मी महाविकास आघाडीची उमेदवार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची मी ऋणी आहे. माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून महाआघाडीत सर्वच पक्षाचे कार्यकर्ते परिश्रम घेतले आहे. तसेच, रमेश लटके यांनी हाती घेतलेली जी कामे अर्धवट आहेत, ती पूर्ण करण्यास माझे प्राधान्य राहणार आहे. अंधेरीचा विकास जनतेच्या साथीने करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT