ऋतुजा लटकेंची मोठ्या विजयाकडे वाटचाल : बाराव्या फेरीअखेर ४५ हजार मते, तर नोटाला ८८८७ मते

आणखी सात फेऱ्यांची मतमोजणी होणे बाकी आहेत.
Rituja Latke
Rituja LatkeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : अंधेरी (Andheri) पूर्व पोटनिवडणुकीत (BY Election) शिवसेनेच्या (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके (Rituja Latke) यांनी अपेक्षेप्रमाणे आघाडी घेतली आहे. मात्र, नोटाला मिळालेली लक्षणीय मते पाहता मध्यंतरी रंगलेली चर्चा खरी होती की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. मतमोजणीच्या बाराव्या फेरीअखेर लटके यांना तब्बल ४५ हजार २१८ मते मिळाली आहेत, तर दुसऱ्या क्रमांकाची ८ हजार ८८७ मते नोटाला मिळाली आहेत. आणखी सात फेऱ्यांची मतमोजणी होणे बाकी आहेत. (Rituja Latke's way to a big victory : 45 thousand votes at the end of the twelfth round)

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा गदरोळ माजला होता. भाजपकडून मुरजी पटेल यांनी, तर शिवसेनेकडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, माघारीच्या आदल्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपला आपला उमेदवार मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. त्याच ठिकाणी लटके यांचा विजय निश्चित झाला होता. मात्र, मध्यंतरी काही पक्षाकडून ‘नोटा’चा पर्याय अवलंबवावा, असे आवाहन करण्यात आल्याची चर्चा होती. मतमोजणीत नोटाला पडलेले मते पाहता ही चर्चा खरी होती की काय, असे दिसून येत आहे.

Rituja Latke
तीन महिन्यांत सरकार पाडले, तर पुढची निवडणूक लढवणार नाही : मुनगंटीवारांचे आव्हान

अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या 2019 मधील विधानसभा निवडणुकीत जवळपास 1 लाख 47 हजार 117 मतदान झाले होते. त्यापैकी रमेश लटके यांना 62 हजार 773 मतं मिळाली, तर मुरजी पटेल यांना 45 हजार 808 मतं मिळाली होती. त्या तुलनेत बाराव्या फेरीतच लटके यांनी ४५ हजार मते मिळाली आहेत. आणखी सात फेऱ्या बाकी आहेत, त्यामुळे ऋतुजा लटके या पती रमेश लटके यांच्यापेक्षा जादा मते घेणार हे निश्चित मानले जात आहे.

Rituja Latke
Sharad Pawar : उद्धव ठाकरे घेणार शरद पवारांची भेट!

बाराव्या फेरीअखेर उमेदवारनिहाय पडलेली मते पुढीलप्रमाणे :

ऋतुजा लटके -45218

बाळा नाडार -1109

मनोज नाईक - 658

मीना खेडेकर - 1083

फरहान सय्यद - 819

मिलिंद कांबळे - 479

राजेश त्रिपाठी - 1149

नोटा - 8887

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com