BJP Politics  Sarkarnama
मुंबई

BJP Politics : विधानपरिषद सभापतीपदासाठी भाजपची 'फिल्डिंग'; CM फडणवीसांच्या 'या' विश्वासू नेत्याला 'कॉन्फिडन्स'

Ahilyanagar BJP Ram Shinde CM Devendra Fadnavis Legislative Council Speaker : विधानपरिषद सभापतीपद खेचून घेण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली असून, या पदासाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू नेत्याचे नाव चर्चेत आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : महायुतीच्या सत्तास्थापनेनंतर भाजपने महत्त्वाची पदे स्वतःकडे ठेवण्याची रणनीती वेगानं सुरू केली आहे.

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवडी झाल्यानंतर आता विधानपरिषदेच्या सभापतीपद खेचून घेण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू नेते कर्जत-जामखेडमधील आमदार प्रा. राम शिंदे यांचे नाव चर्चेत आहेत.

राज्यात 2022 मध्ये महायुतीचे सरकारवेळी भाजपचे प्रा. राम शिंदे यांची सभापतीपदी नावाची जोरदार चर्चा होती. परंतु एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना सभापती करण्याचा आग्रह धरला. त्यातून महायुतीत पेच वाढला. पुढे यावर एकमत होऊ शकले नाही. भाजपने याकडे दुर्लक्ष केले आणि सभापतीपद रिक्त राहिलं.

राज्यात आता महायुतीला बहुमतापेक्षा सर्वाधिक यश मिळालं आहे. यात भाजपला सर्वाधिक यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, गेली अडीच वर्षे भाजप (BJP) आमदारांनी सत्तेत राहून मंत्रि‍पदापासून दूर राहून संयम दाखवला आहे. मात्र आताच्या बहुतमाने भाजपमध्ये मंत्रिपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. तसेच महत्त्वाच्या पदावर वर्णी लागावी, यासाठी अनेकांची वरिष्ठांकडे फिल्डिंग लावली आहे.

विधानसभा अध्यक्षाच्या निवडीनंतर आता विधानपरिषदेच्या सभापतीपदाच्या निवडीची चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुकीत देखील भाजप महायुतीने बाजी मारली. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी महाविकास आघाडीला विधानपरिषदेत देखील रोखले. यात देवेंद्र फडणवीस यांचा संयम, रणनीती महत्त्वाची ठरली. यामुळे विधानपरिषदेच्या सभापतीपदी देखील भाजप दावा करणार असल्याचे संकते आहेत. त्यानुसार पुन्हा एकदा प्रा. राम शिंदे यांचे नाव चर्चेत आले आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपचे विधानपरिषद सदस्य तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रवीण दरके विजयी झाले. शिवसेनेकडून आमश्या पाडवी आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांनीही विधानसभा निवडणुकीत यश मिळवले. त्यामुळे विधान परिषदेच्या आणखी सहा जागा रिक्त झाल्या आहेत. २७ जागा पूर्वीच रिक्त झाल्या होत्या. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ विधानपरिषद सदस्यांपैकी अमोल मिटकरी, रामराजे नाईक निंबाळकर, सतीश चव्हाण आणि विक्रम काळे हे चार सदस्य उपमुख्यमंत्री अजित पवार याचे आहेत.

अजित पवार यांनी मध्यंतरी रामराजे निंबाळकर यांना सभापतीपदाचा शब्द दिला होता. तसा आग्रही महायुतीकडे केला होता. लोकसभेला माढा, सोलापूर मागात रामराजे निंबाळकर यांनी महायुतीचे लोकसभेतेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतली. एवढेच नव्हे, तर ते 'मविआ'त सामील झाले. त्यामुळे आता रामराजे यांना सभापतीपद देण्यास महायुतीमधून विरोध आहे. विधानपरिषदेचे सभागृह विधेयक मंजूर करून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे विधानसभेपाठोपाठ विधानपरिषदेचे सभापती खेचून घेण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT