BJP National President Election : भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत 'ही' दोन तरुण चेहरे; विनोद तावडे पडले मागे?

BJP President Selection Procedure Starting January 15 : भाजपला राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीचे वेध लागले असून, ही निवडीची प्रक्रिया 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजपचा विजयरथाची घोडदौड सुरू असताना संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल आगामी काळात होतील. याची सुरवात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीपासून, सुरू होईल. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर भाजपला राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत.

पक्षाध्यक्ष निवडीची ही प्रक्रिया 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान यांची नावे चर्चेत आहेत. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे संकेत आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) अभुतपूर्व यश मिळवले. या यशाचे शिल्पकार केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान या तरुण नेत्यांची पक्षाध्यक्ष पदासाठी नावे चर्चेत आहेत. देशाचे पंतप्रधान पश्चिमेतून राष्ट्रपती पूर्वेतून, उपराराष्ट्रपती उत्तरेतून असल्यामुळे भाजपच्या पक्षाध्यक्षपदासाठी दक्षिणेतील नेत्याला संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते.

पक्षाध्यक्ष पदासाठी सुरवातीला महाराष्ट्रातून विनोद तावडे यांचे नाव देखील मध्यंतरी चर्चेत होते. महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या रणनीतीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस या पदाची त्यांच्यावर सध्या जबाबदारी आहे.

BJP
V K Saxena News : दिल्लीत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींविरोधात आता उपराज्यपाल अ‍ॅक्शन मोडवर

दिल्ली विधानसभा निवडणूक फेब्रुवारी महिन्यात आहेत. या निवडणुकीपूर्वीच भाजपने पक्षाध्यक्षपदाची निवड जानेवारी करून, घेण्याचे ठरवले आहे. जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांचा पक्षाध्यक्षपदाची कार्यकाळ संपल्याने कार्यकारी अध्यक्ष नेमला जाईल, अशी चर्चा होती. परंतु आता हंगामी कारभार कोणाच्या हाती न देता थेट पक्षाध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यानुसार पक्षातंर्गत वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आला आहे.

BJP
Sanjay Malhotra New RBI Governor : मोदी सरकारची मोठी घोषणा! 'आरबीआय'च्या 'गव्हर्नर'पदी संजय मल्होत्रा

देशात भाजप सदस्य नोंदणीची मोहीम राबवली जात आहे. ही प्रक्रिया 31 डिसेंबरपर्यंत राबवली जाणार आहे. याशिवाय पक्षाअंतर्गत निवडणुकांना देखील होत आहेत. मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. देशातील प्रत्येक जिल्ह्यातील अध्यक्ष, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत.

राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष निवडल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्त्या 15 जानेवारीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांच्या मंत्रि‍पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवा प्रदेशाध्यक्ष कोण? याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com