Political and administrative implications for Ahilyanagar : कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. पासपोर्ट मिळवण्यासाठी अहिल्यानगरमधील पत्ता दिला होता. अर्थातच हा पत्ता बनावट होता. पण पोलिसांनी त्याचे व्हेरिफिकेशन केले नाही का, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलिसांना माहिती नव्हती का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. याआधी खेडकर प्रकरणात जिल्ह्यातील प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला होता.
आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार यांनी या घटनांवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियात एक पोस्ट करत अहिल्यानगर ‘स्पेशल प्रोटेक्शन झोन’?, असा गंभीर सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये गुंड घायवळला मिळालेला पासपोर्ट तसेच खेडकरांना मिळालेले विशेष संरक्षण आदी मुद्दे उपस्थित केले आहेत.
कुंभार यांनी पोष्टमध्ये म्हटले आहे की, गुंड निलेश घायवळने पासपोर्टसाठी नगरमधील पत्ता वापरला. पुण्यात त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, त्यामुळे पासपोर्ट मिळणार नाही हे ओळखून त्याने नगरचा बनावट पत्ता दिला. कोतवाली पोलिसांनी त्याचा गुन्हेगारी इतिहास तपासल्याशिवाय संमती दिली.
याआधी पुजा खेडकरला बनावट अपंगत्व व नॉन क्रिमीयन लेयर दाखला नगरमधून मिळाला होता. दिलीप खेडकर व कुटुंबीयांवर नगरमध्ये गुन्हे दाखल असूनही आजवर कोणतीही कारवाई नाही. याचा अर्थ गुन्हेगार, बनावट कागदपत्रं, विशेष संरक्षण हे सगळं अहिल्यानगर “प्रोटेक्शन क्लब” झाल्याचं द्योतक नाही का?, असा सवाल कुंभार यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, घायवळच्या परदेशात पळून जाण्यामागे आता राजकीय कनेक्शन असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्याचे राजकीय संबंध लपून राहिलेले नाहीत. यापूर्वी काही नेत्यांसोबत तो दिसून आला आहे. विधिमंडळाच्या आवारातही त्याला एन्ट्री मिळाली हीत. त्याचे रील्स व्हायरल झाले होते. त्यामुळे त्याच्या पासपोर्टसाठी राजकीय वजन वापरण्यात आले का, अशी चर्चा आहे. नवी मुंबईतील ट्रक क्लिनरच्या अपहरणप्रकरणी पोलिस दिलीप खेडकर व त्यांच्या पत्नीचा शोध घेत आहेत. पण अद्याप ते दोघे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांचेही अहिल्यानगरशी थेट कनेक्शन आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.