Medha Kulkarni News : तरुणाई नासवणारा कार्यक्रम, आता थांबणार नाही! मेधा कुलकर्णींचा संताप, थेट फडणवीसांकडे जाणार...

BJP MP Medha Kulkarni’s Stand Against Offensive Songs in Garba : मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ज्या अटी-शतीसह त्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली होती, त्या अटीशर्तींचा भंग करून मोठ्या आवाजात तो कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही बंद पाडला.
“BJP MP Medha Kulkarni plans a public movement against offensive songs and disorderly Garba events, seeks support from Devendra Fadnavis.”
“BJP MP Medha Kulkarni plans a public movement against offensive songs and disorderly Garba events, seeks support from Devendra Fadnavis.”Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : कोथरूड मधील जीत ग्राउंडमध्ये सुरू असलेल्या गरब्याच्या कार्यक्रमामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी थेट कार्यक्रम स्थळी पोहोचत हा कार्यक्रम बंद पाडला. तसेच या ठिकाणी आता पुन्हा हा कार्यक्रम होणार नाही, असे देखील मेधा कुलकर्णी यांनी जाहीर करून टाकलं. मात्र आता फक्त कोथरूडमधील कार्यक्रम थांबवून मेधा कुलकर्णी ह्या शांत बसणार नसून आता पुढे संपूर्ण पुण्यामध्ये जनआंदोलन उभारणार असल्याचे सांगितले आहे.

माध्यमांशी बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या, त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या आवाजात गरब्याचा कार्यक्रम सुरू होता. ज्यामुळे घरातल्या वस्तू थरथरत होत्या, काचा थडथडत होत्या आणि दाराची कडी कडकड वाजत होती. अशा परिस्थितीत त्या ठिकाणी मोठ्या आवाजात गाणी सुरू होती आणि धिंगाणा सुरू होता. ज्या पद्धतीची गाणी त्या ठिकाणी लावण्यात आली होती, ती देखील आक्षेपार्ह गाणी होती.

असंख्य नागरिकांचे मला फोन आले. मी याबाबत पोलिसांना देखील कळवलं. मात्र पोलिसांनी त्यावर वेळीच ॲक्शन घेतली नाही. त्यामुळे मी त्या ठिकाणी स्वतः जाण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत मी पोलिसांना कळवलं पोलिसांनी आम्ही देखील त्या ठिकाणी पोहोचत असल्याचं सांगितलं. मात्र प्रत्यक्षात ते वेळेत पोहोचलेच नाहीत, असे खासदार म्हणाल्या.

“BJP MP Medha Kulkarni plans a public movement against offensive songs and disorderly Garba events, seeks support from Devendra Fadnavis.”
Maharashtra Flood 2025 : पावसाचा धुमाकूळ; 2019 मधील शहांच्या निर्णयाचा फायदा महाराष्ट्राला कधी? मोदींचंही ठरेना...

ज्या अटी-शतीसह त्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली होती, त्या अटीशर्तींचा भंग करून मोठ्या आवाजात तो कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे तिथे जाऊन तुम्ही बंद पाडला. पोलिसांनी त्या ठिकाणी पुढे होऊन त्या ठिकाणचे इन्स्ट्रुमेंट जप्त करणे आवश्यक होतं. मात्र तसं पोलिसांनी केलं नाही, अशी नाराजी खासदार कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाने धार्मिकतेचं विचित्र रूप धारण केले आहे. तरुणाईला बिघडवणारा हा कार्यक्रम आहे. आज तरुणाईमध्ये हिंदुत्वाने जागृत होण्याची गरज आहे. मात्र संपूर्ण तरुणाई नासवून टाकण्याचं काम अशा प्रकारच्या आयोजनातून करण्यात येत असेल तर त्याला माझा आक्षेप असणार आहे. त्यामुळे आता संबंध पुण्यामध्ये या विरोधात जनआंदोलन आम्ही पुकारणार असल्याचं मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं.

“BJP MP Medha Kulkarni plans a public movement against offensive songs and disorderly Garba events, seeks support from Devendra Fadnavis.”
Medha Kulkarni Garba Issue: नागरिकांचे फोन मेसेज आले अन मेधा कुलकर्णी प्रचंड संतापल्या, मग थेट जाऊन गरबाच बंद पाडला

अशा प्रकारच्या डीजेचा वापर असलेल्या कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी देऊ नये. तसेच सोसायटीच्या परिसरात परवानगी देत असल्यास आवाजाच्या मर्यादेवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे याबाबत आता पुणे पोलीस आयुक्तांना आम्ही भेटणार आहोत. तसेच मुख्यमंत्र्यांना देखील याबाबत भेटून कल्पना देणार असून सबंध महाराष्ट्रात अशा प्रकारचे जन आंदोलन उभारणं आवश्यक आहे. मात्र आम्ही याची सुरुवात पुण्यातून करणार अहोत जेणेकरून सणांचं विडंबन अशा पद्धतीने होणार नाही, असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com