Mumbai News : जानेवारी महिन्यात झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत जिंकून आलेली एमआयएमची नगरसेविका सहर शेखनं 'कैसे हराया' म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना डिवचलं होतं. तसेच विजयी सभेत संपूर्ण मुंब्य्राला पुढच्या पाच वर्षांत हिरवं करण्याची भाषा केल्यामुळे चांगल्याच वादात अडकल्या होत्या. पण अवघ्या तीनच महिन्यांत सहर शेखचं नगरसेवकपद धोक्यात आले आहे.
ठाणे तहसीलदारांनी तक्रारदार जावेद सिद्दीकी यांच्या तक्रारीनंतर केलेल्या तपासात सहर शेखनं बनावट जात प्रमाणपत्र सादर करून शासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच त्यांचे नगरसेवक पदावरही टांगती तलवार आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून ‘एमआयएम'च्या मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेख व तिचे वडील दोघेही नॉट रिचेबल होते. त्यामुळे आणखीच राजकीय वातावरण तापलं होतं.
पण आता एमआयएमच्या नगरसेविका सहर शेखच्या वडिलांनी शुक्रवारी(ता.17) सर्व आरोप फेटाळले असून त्यांनी येत्या दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला आहे. याचदरम्यान, त्यांनी नॉट रिचेबलबाबतही खुलासा केला आहे.
युनूस शेख यांनी आमच्या घरी चुलत्याचं निधन झालं होतं. त्या गडबडीत आम्ही सगळेजण होतो. पण याचवेळी त्यांना सहर शेख ही मुंबई आणि पंजाब यांच्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात उपस्थित होती. यावरुन सवाल करण्यात आला. त्यावर मग काय झाले, कुठे जायचे नाही का, जाऊ शकतो, असंही युनुस शेख यांनी म्हटलं.
कायदा आणि प्रशासनावर आम्हाला विश्वास आहे. जे असेल, ते पुढील दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन सगळे सांगणार असल्याचंही युनुस शेख यांनी स्पष्ट केलं.तसेच आमच्यावर होत असलेले आरोप खोटे असून आम्ही खोटेपणा करणारी माणसं आहोत का, असा प्रतिसवाल करतानाच सगळ्या गोष्टी बाहेर काढणार असल्याचा इशाराही शेख यांनी दिला आहे.
ठाणे महानगरपालिकेत पहिल्यांदाच एमआयएमच्या तिकीटावर निवडून आलेल्या सहर शेख विजयानंतर पहिल्या दिवसांपासून चर्चेत राहिली आहे. पण नुकतंच जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर ती दोन दिवस नॉट रिचेबल होती. पण त्यानंतर सहर शेखनं इन्स्टाग्रामवर स्टेडियमच्या गॅलरीतील व्हिडीओ पोस्ट केला आहे.
सहर शेखनं संबंधित व्हिडीओ पोस्ट करताना गेम ओव्हर...असं लिहिलं आहे. तसेच तूने ना जाना तेरे जाने से क्या क्या हुआ, कितनी कहानी बनी कितना तमाशा हुआ.. जाने तू कैसी होगी... असे गीत सहर शेखने व्हिडीओसोबत पोस्ट केले. सहर शेख वानखेडे स्टेडियमवर गेल्याबाबतही युनूस शेख यांना प्रश्न विचारण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.