Waris Pathan Ritu Tawde Dia Mirza Controversy : फटाक्यांमुळे मुंबईत झालेल्या आगीच्या दुर्घटनांमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी भाजपच्या महापौर रितू तावडे यांनी केलेल्या अहवानावर, अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या व्हिडिओवरून केलेल्या राजकरणाची आठवण करून देताना, AIMIMचे नेते वारिस पठाण यांनी चांगलेच सुनावले.
"तुम्हाला खूप उशीर झाला आहे. महापौर रितू तावडे यांना आता याची जाणीव झाली का?" असा प्रश्न करत वारिस पठाण यांनी सुनावले आहे.
मुंबईच्या (Mumbai) महापौर ऋतु तावडे यांनी सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहनावरून, AIMIMचे नेते वारिस पठाण म्हणाले, "तुम्हाला खूप उशीर झाला आहे. महापौर ऋतु तावडे यांना आताच याची जाणीव झाली का? मुंबईत कालच्या दिवसाइतक्या आगीच्या घटना यापूर्वी कधीच घडल्या नव्हत्या. गेल्या दोन दिवसांत अग्निशमन दलाला 142 ठिकाणी आग लागल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 137 आगीच्या घटना फटाक्यांमुळे घडल्या आहेत."
अभिनेत्री दिया मिर्झा यांनीही नागरिकांना रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी फटाके न फोडण्याचे आवाहन केले होते. मुंबई उच्च न्यायालयानेही (High Court) यासंदर्भात आदेश दिला होता. असे असताना तुम्ही आता याबाबत का बोलत आहात? आता नेमके काय बदलले? असा सवाल देखील AIMIM वारिस पठाण यांनी केला.
मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यास संपूर्ण वर्षभर सर्व सणांच्या काळात मनाई केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने सेलिब्रिटीच्या माध्यमांतून तसे आवाहन देखील केली होते. याबाबत व्हिडीओ देखील बीएमसीने प्रसिद्ध केला होता. यात अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या व्हिडिओवरून भाजप नेत्यांनी वाद उकरून काढला होता. सेलिब्रिटीच्या व्हिडिओतून दिया मिर्झा यांचा व्हिडीओ हटवण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत वाद गेला होता.
भाजप महापौर रितू तावडे यांनी दिया मिर्झा या हिंदूविरोधी आहे, दिवाळी सण कसा साजरा करायचा हे त्यांनी आम्हा हिंदूंना शिकवू नये, असे म्हटले होते. परंतु दिवाळीच्या पहिल्या दिवशी फटक्यांमुळे मुंबई आणि परिसरात फटाक्यांमुळे 137 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. ठाण्यात 17 मजली इमारतीला आग सातव्या ते चौदाव्या मजल्यापर्यंत पसरली. यात 50 नागरिकांची सुटका करण्यात आली. कल्याण-डोंबिवलीत दिवसभरात 70 आगींची नोंद झाली. या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल झाले. भाईंदरमध्ये 107 आगींच्या घटना घडल्या. नवी मुंबईत एका रात्रीत 62 आगी लागल्या.
या आगीच्या घटनांनंतर, महापौर रितू तावडे यांनी नागरिकांना सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. ‘आपल्या सणाचा आनंद दुसऱ्याच्या दुःखाचे कारण बनू नये’, असेही आवाहनात त्यांनी नमूद केले. महापौर रितू तावडे यांच्या या आवाहनानंतर, AIMIMचे नेते वारिस पठाण यांनी टायमिंग साधत, चांगलेच सुनावले आहे.
मुंबई आणि नवी मुंबईत दिवाळीत फटाक्यांमुळे आगीच्या घटना वाढल्याने रॉकेटसह हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर प्रतिबंधात्मक बंदी घालण्यात आली आहे. मुंबईत 25 नोव्हेंबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहेत. तर, नवी मुंबईत 8 जानेवारीपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई होईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.