Ravi Rana Minister : 'पुढच्या वर्षी मंत्री म्हणूनच येणार!' रवी राणांचा नरकासुर दहनात मोठा दावा; म्हणाले, 'नेत्याने शब्द दिलाय'

Ravi Rana says he will become a Maharashtra minister next year. The MLA claims his leadership has promised him a ministerial post during Badnera Narakasur Dahan : महायुती सरकारमध्ये मंत्रिपदासाठी रवी राणा पुन्हा आग्रही; बडनेऱ्यातील नरकासुर दहन कार्यक्रमात व्यक्त केला विश्वास, म्हणाले, 'महाराष्ट्राचा मंत्री म्हणून शपथ घेईन'
Ravi Rana
Ravi RanaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ravi Rana Minister Statement : राज्याच्या सत्ताधारी महायुतीत भाजपबरोबर असलेली युवा स्वाभिमान संघटनेचे प्रमुख आमदार रवी राणा यांनी मंत्रि‍पदाची इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे.

अमरावतीच्या बडनेरात नरकासुर पुतळ्याचे दहनावेळी आमदार राणा यांनी मंत्रि‍पदावर मोठे विधान केले आहे. पुढच्या वर्षी नरकासुर दहनाला मंत्री राहून येथे येईल, असे म्हटले आहे.

अमरावतीच्या (Amravati) बडनेरात नरकासुर पुतळ्याचे दहन करण्याची जुनी परंपरा आहे. गेल्या 88 वर्षांपेक्षाही अधिक काळापासून हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या वर्षी आमदार रवी राणा यांच्या हस्ते नरकासुर दहन करण्यात आले. याचवेळी आमदार राणा यांनी आपल्या मंत्रि‍पदावर मोठे भाष्य केले.

आमदार रवी राणा (Ravi Rana) म्हणाले, "पुढच्या वेळेस नरकासुर दहनाला मंत्री राहूनच येथे येईल आणि नरकासुर दहन करेल. मला माझ्या नेत्यावर, नेतृत्वावर विश्वास आहे. मला शब्द दिला आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा मंत्री म्हणून मी शपथ घेईल. मंत्री झाल्यावर या बडनेराला अमरावती जिल्ह्याला महाराष्ट्राला न्याय देण्याचा काम मी करेल." रवी राणा तुमच्या सोबत उभा आहे. घराघरात किराणा आणि आईला साडी मिळाली पाहिजे, ही माझी जिद्द आहे. सर्वांची दिवाळी चांगली झाली पाहिजे, असेही आमदार राणा यांनी म्हटले.

Ravi Rana
Prakash Ambedkar On RSS : 44 हजार काडतुसांच्या तस्करीत RSS कनेक्शन? प्रकाश आंबेडकरांचा संघावर घणाघात; राहुल गांधींनाही सुनावले!

आमदार राणा आणि त्यांची पत्नी माजी खासदार नवनीत राणा यांनी, यंदाची दिवाळी दिव्यांगांबरोबर साजरी केली. दिव्यांग बांधवांना किराणा साहित्य, दिवाळी फराळ आणि आवश्यक उपकरणांचे वाटप करण्यात आले. रवी राणा यांनी या वेळी दिव्यांग बांधवांच्या मानधनाबाबत बोलताना, "आमदारांचा पगार बंद केला तरी चालेल, पण दिव्यांग बांधवांचे मानधन वाढवावे," असे मोठे विधान केले.

Ravi Rana
Gokul Milk Union : 'अमूल'च्या विस्तारासाठी 'महानंद'नंतर 'गोकुळ' ध्वस्त करण्याचा डाव; डाॅ. अजित नवलेंचा सरकारच्या कुटील डावावर संताप

दिव्यांग बांधवांना मिळणारे मानधन दरमहा 5 हजार ते 10 हजार रुपये करण्यात यावे, अशी मागणी आमदार राणा यांनी केली. राणा दाम्पत्याने अमरावती जिल्ह्यात सुमारे 3 लाख कुटुंबांपर्यंत दिवाळीचा किराणा पोहोचवण्याचा संकल्पही जाहीर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.