Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Budget Speech : 'तुफानों में संभलना जानते है, अंधेरों को बदलना जानते है!' अजितदादांचा शायराना अंदाज..

Maharashtra Budget Session : अजित पवारांचे आजचे बजेटचे भाषण शेरोशायरी आणि संत तुकारामांच्या अभंगांनी सजले होते.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत फक्त 17 जागांवर समाधान मानावे लागलेल्या महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. यातूनच आपल्या दहाव्या बजेटमध्ये वित्तमंत्री अजित पवारांनी अनेक योजनांची घोषणा केली.

तसेच अजितदादांनी 'तुफानों में संभलना जानते है, अंधेरों को बदलना जानते है!' असे म्हणत राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार, असा विश्वास व्यक्त केला. अजित पवारांचे आजचे बजेटचे भाषण शेरोशायरी आणि संत तुकारामांच्या अभंगांनी सजले होते.

वारीला जागतिक वारसा

बजेटच्या सुरुवातीस पवारांनी राज्यात सुरू असलेल्या वारीचा उल्लेख केला. या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोला प्रस्ताव देणार असल्याचे जाहीर केले. तसेच वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिंडीला 20 हजार रूपायांचे अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. तर या वारीत सहभागी होणाऱ्या शासनाच्या निर्मल वारीसाठी 36 कोटी 71 लाख रुपयांचा निधीही उपलब्ध केल्याचे अजित पवारांनी Ajit Pawar सांगितले. यासाठी अजितदादांनी एका अभंग म्हटला.

उदंड पाहिले, उदंड ऐकिले

उदंड वर्णिले, क्षेत्रमहिमे |

ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर

ऐसा विटेवर, देव कोठे ||

ऐसे संतजन, ऐसे हरिचे दास

ऐसा नामघोष, सांगा कोठे |

तुका म्हणें, आम्हां अनाथाकारणें

पंढरी निर्माण, केली देवें ||

शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

लोकसभेला शेतकरी नाराज होते. आता त्यांना खूश करण्याचाही प्रयत्न या बजेटमधून करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी मागेल त्याला सौरपंप या योजनेची घोषणा केली. याचा 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी एक शेर सादर केला.

तुफानों में संभलना जानते है

अंधेरों को बदलना जानते है

चिरागों का कोई मजहब नहीं है

ये हर मेहफिल में जलना जानते है..

अजितदादांच्या या 'आशावादा'ला सत्ताधारी आमदारांनी जोरदार दाद दिली.

सर्वसामान्यांचं सरकार

राज्यातील दारिद्र्य निर्मूलन करण्यास महायुतीचे सरकार कटिबद्ध असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले. यासाठी हे सरकार समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालणार असल्याची ग्वाही दिली. राज्यातील गरीब लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी शासनाच्या योजनां सांगून अजितदादांनी पुन्हा एकदा शेर म्हटला. त्यातून महायुती सरकार कायम गरीब लोकांसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सूचित केले.

अजितदादा म्हणाले,

हयात लेके चलो

काएनात लेके चलो

चलो तो सारे जमाने को

साथ लेकर चलो…

शेवट संत तुकाराम यांच्या अभंगाने

अजित पवारांनी बजेटमध्ये सर्व घटकांसाठी अनेक योजानांची घोषणा केली. यात महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही समावेश आहे. शेतकऱ्यांसह राज्यातील गरीब लोकांचे कल्याण, विद्यार्थिनींना मोफत शिक्षण आदी योजनाही त्यांनी सांगितल्या. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अजितदादांनी संत तुकारामांच्या अभंगाने आपल्या भाषणाचा शेवट केला.

ते म्हणाले,

निंदी कुणी मारी, वंदी कुणी पूजा करी,

मज हेही नाही, तेही नाही, वेगळा दोन्हीपासूनी

या न्यायाने केलेल्या कामाची ही पावती आहे असं मी मानतो.

तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा,

तरी माझ्या दैवा, पार नाही...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT