Maharashtra Monsoon Session : 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठला'चा गजर करत अजित पवारांची वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा

Ajit Pawar in Maharashtra Monsoon Session : विधानसभेत 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय...' असा गजर करत अजित पवारांनी अर्थसंकल्पाला सुरुवात केली.
Ajit Pawar in Maharashtra Monsoon Session
Ajit Pawar in Maharashtra Monsoon SessionSarkarnama

Maharashtra Monsoon Session : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी (ता.28) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. विधानसभेत 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय...' असा गजर करत अजित पवारांनी अर्थसंकल्पाला सुरुवात केली. तर आषाढी वारीचे औचित्य साधत त्यांनी वारकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या.

वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्यासह, जागतिक वारसा नामांकनासाठी वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, " तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान होत आहे. उद्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ( Dnyaneshwar Maharaj Palkhi) आळंदीतून निघणार आहे. या पालखीशी महाराष्ट्राची नाळ जोडली आहे. पंढरीला देहू आणि आळंदीतून जाणाऱ्या या वारीची जगात दखल घेतली जाते.

म्हणून या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच आपल्या परंपरेची पताका खांद्यावर घेऊन जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांप्रती कृतज्ञता म्हणून प्रतिदिंडी 20 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे."

Ajit Pawar in Maharashtra Monsoon Session
Uddhav Thackeray And Sanjay Raut : शिंदे सरकारला 'सळो की पळो' करुन सोडणाऱ्या राऊतांना ठाकरे मोठं बक्षीस देणार, दिल्लीत 'हे' मोठं पद मिळणार

मुख्यमंत्री वारकरी सांप्रदाय महामंडळ

तसंच यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून मुख्य पालखी मार्गावरील वारकऱ्यांची तपासणी केली जाणार असून वारकरी, किर्तनकार, भजनी मंडळ या सर्वांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचंही पवार यांनी सांगितलं.

Ajit Pawar in Maharashtra Monsoon Session
Maharashtra Budget 2024 : अजितदादांचे शेतकऱ्यांसाठी 'मोठं गिफ्ट'; पूर्णपणे वीजमाफ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com