Ajit Pawar  Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar News : '...या ठिकाणी समन्वय साधण्याचं ठरवलं होतं, पण ते झालं नाही'; महायुतीवर अजित पवार स्पष्टचं बोलले!

Mayur Ratnaparkhe

Ajit Pawar on Mahayuti : लोकसभा निवडणुकीत देशात जरी भाजप नेतृत्वातील एनडीए आघाडीचं पुन्हा एकदा सरकार आलं आहे. तरी महाराष्ट्रात मात्र महायुतीला चांगलाच फटका बसला आहे. राज्यात विरोधी पक्षांचया महाविकास आघाडीने यश मिळवलं आहे.

त्यामुळे आता आगामी विधनासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू झाले असून, त्यादृष्टीने सर्वच पक्षांच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन अन् सूचना करण्यात आल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या काळात विभागनिहाय, जिल्हानिहाय, तालुकानिहाय महायुतीमध्ये समन्वय साधण्याचं ठरवलं होतं पण ते झालं नाही. अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते गुरुवारी मुंबईतील षणमुखानंद सभागृहात आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनीही वाचाळवीर प्रवक्त्यांना याप्रसंगी फटकारल्याचे दिसून आले.

अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले, 'कुठंही आपल्यामध्ये वादविवाद होता कामानये. कुठंकाही वेडंवाकडं घडलं तर ते महायुतीच्या कार्यकर्त्याकडून घडलं, असं अजिबात होता कामानये. लोकसभा निवडणुकीत आपण जसा अंदाज व्यक्त केला तसे यश मिळाले नाही. बाकीच्या राज्यात ते यश मिळाले त्यामुळे NDA सरकार आलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले. विरोधकांनी वेगवेगळ्या समाजात चुकीचे मेसेज दिला आणि त्यांना यश आले. विरोधक महाराष्ट्रात खोटं पसरविण्यात यशस्वी ठरले पण संविधानाला सर्वाधिक सन्मान मोदींनी दिला.'

'संविधान बदल, समान नागरी कायदा याबाबत गैरसमज पसरविले गेले, नकारात्मक भावना याबाबत पसरविली गेली, विरोधक यात यशस्वी झाले, याची किंमत आपल्याला मोजावी लागली. विरोधकांनी पसरविलेला गैरसमज हाणून पाडण्याचं काम आपण केलं पाहिजे. विभागनिहाय, जिल्हानिहाय, तालुकानिहाय समन्वय साधण्याचं ठरवलं होतं पण ते झालं नाही. असं म्हणत एकप्रकारे महायुतीत समन्वय राखण्यात अपयश आल्याची जाहीर कबुलीच अजित पवारांनी दिली.

याशिवाय आता समन्वय राखण्यासाठी लगेच कामाला लागू. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांनी समन्वयाने काम करण्याची भूमिका घ्यावी. विरोधक घाबरलेले आहेत, त्यांनी काहीही आरोप केले तरी आपण विकासावरच बोलायचं. असं आवाहनही यावेळी अजित पवार यांनी केलं.

तसेच 'विरोधकांनी नरेटिव्ह पसरविला तर त्याला जबरदस्त Counter Attack द्यावा लागेल. सोशल मीडिया स्ट्रॉंग करावा लागेल. महायुती आपला परिवार आहे. परिवाराच्या प्रमुखांवर विश्वास ठेवा. निवडणुकीच्या पूर्वी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायचं काम करा. महायुतीची बदनामी टाळा, जो बदनामी करेल त्याच्यावर कारवाई करणार.' असा इशाराही अजित पवारांनी महायुतीतील बंडखोरांना यावेळी दिला.

याशिवाय, काहीही करा पण कांदा निर्यात बंदी करु नका अशी मागणी अजित पवारांनी पीयूष गोयल(Piyush Goyal) यांच्याकडे जाहीर व्यासपीठावरून केली. तसेच कांदा निर्यात बंदीची मोठी किंमत मोजावी लागली, असंही त्यांनी बोलून दाखवलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT