Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजितदादांच्या कट्टर समर्थक नेत्यानं वारं फिरवलं; चक्क शरद पवारांच्या शिलेदारालाच जिंकून आणलं..!

NCP Political News : शरद पवार गटाच्या संपर्कात असलेल्या अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये सुनील शेळके यांच्याही नावाची चर्चा आहे.
Ajit Pawar, Sharad Pawar
Ajit Pawar, Sharad PawarSarkarnama

Lonawala News : महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत दोन मोठे बंड झालेले पाहायला मिळाले. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांसारख्या दोन मातब्बर नेत्यांचेच पक्ष फुटल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलून गेले.या दोनही बंडांची धग आजही कायम आहे.

लोकसभेच्या निकालानंतर राजकीय वारे बदलू लागले आहे.अजित पवार गटातील आमदार पुन्हा एकदा शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची कुणकुण आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवक यांनीही पवारांची भेट घेतली होती. एकीकडे असं सगळं असतानाच आता सर्वांच्याच भुवया उंचावणारी बातमी समोर आली आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar
Nilesh Lanke and Rani Lanke : पदर खोचला, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच चूल पेटवली; राणी लंकेंचा भाकरी भाजता-भाजता सरकारला इशारा

एकीकडे राष्ट्र्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडत आहे.याचदरम्यान,आता अजित पवार गटाच्या आमदारांनी चक्क शरद पवार गटाच्या खासदारालाच जिंकून आणल्याची माहिती पुढे येत आहे.

खासदार सुरेश म्हात्रे यांच्या निवडणुकीतील विजयावर आमदार सुनील शेळके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,खासदार बाळ्यामामा आणि मी असे दोघेही स्वतंत्र पक्षात आहोत.मात्र,आमचे प्रेम वेगळे आहे. मी त्यांना शब्द दिला होता.तो मी पाळल्याचेही शेळके यांनी सांगितले.

Ajit Pawar, Sharad Pawar
Manoj Jarange Emotional : हिंगोलीत मनोज जरांगे भावूक; मराठा समाजाला केलं मोठं आवाहन, म्हणाले...

शरद पवार गटाच्या संपर्कात असलेल्या अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये सुनील शेळके यांच्याही नावाची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी मी त्यांच्या संपर्क केलेल्यांच्या यादीत असेल तर त्यांना विचारा मग कधी येऊ अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. तसेच आपण अजितदादांसोबत होतो, आहोत आणि यापुढेही त्यांच्यासोबतच असणार असेही आमदार शेळके यांनी ठणकावून सांगितले.

मावळमध्ये महायुतीत खटके...

मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार गटासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता. अजित पवार गटातील काही कार्यकर्त्यांनी माझा शंभर टक्के प्रचार केला नसल्याचा आरोप बारणे यांनी केला होता. बारणे यांचं हे वक्तव्य अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्या चांगलंच जिव्हारी लागलं होतं. त्यामुळे त्यांनी आता बारणेंना महायुतीत तेढ निर्माण होतील अशी वक्तव्य करु नये, असा सल्लाही दिला होता..

Ajit Pawar, Sharad Pawar
Video Ravikant Tupkar : विधानसभेला उमेदवार उतरवणार, तुपकरांची मोठी घोषणा; पण स्वाभिमानी की दुसऱ्या पक्षातून?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com