Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

NCP Breaking News : अजित पवारांची राष्ट्रवादीचे विधिमंडळ गट नेते म्हणून नियुक्ती; प्रफुल्ल पटेलांची घोषणा

सरकारनामा ब्यूरो

Political News: अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. त्यानंतर राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. यानंतर आता सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे.

याबरोबरच अजित पवारांची राष्ट्रवादीचे विधिमंडळ गट नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची मोठी घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. याबरोबरच जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या पत्राचा काहीही उपयोग नाही. अपात्रतेची कारवाई करण्याचे अधिकार फक्त विधानसभेच्या अध्यक्षांना आहेत, असंही यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले.

याबरोबरच राष्ट्रवादीचे विधानसभेचे प्रतोद म्हणून अनिल पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे. याचवेळी पक्षाचा विधिमंडळ नेता म्हणून अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली.

अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आम्ही पक्षासोबत आहोत आणि पक्षाच्या चिन्हावरच पुढच्या निवडणुका लढवू, असं भाष्य त्यांनी केलं होतं. यानंतर आता अजित पवार यांनी पक्ष पातळीवरती पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी सुरुवात केली आहे.

याच पार्श्वभूमीवर आज काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याबाबतची घोषणा देखील प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT