NCP Election Commission News : शिवसेनेच्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीने घेतला धडा; थेट निवडणूक आयोगात धाव : जयंत पाटील म्हणाले...

NCP News : अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
Jayant Patil, Ajit Pawar News
Jayant Patil, Ajit Pawar NewsSarkarnama

Jayant Patil News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या आमदारांवर पक्षा विरोधात कारवाई केली म्हणून त्यांना अपात्र करण्यात यावे, असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभा अध्यक्षांना दिले आहे.

या संदर्भात जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या ९ सदस्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांना कोणतीही कल्पना न देता पक्ष धोरणाच्या, हिताच्या विरोधात कारवाया करत शपथ घेतली. ती त्यांची कृती बेकायदेशीर असून पक्षाला अंधारात ठेवल्याने याबाबत एका सदस्याने शिस्तभंग समितीकडे तक्रार केली. त्यानंतर समितीच्या सूचनेवरून त्या ९ जणांचे सदस्यत्व रद्द करण्याची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे ईमेलद्वारे दाखल केली.

Jayant Patil, Ajit Pawar News
Kirit Somaiya News : किरीट सोमय्यांचा 'अभ्यास' पुन्हा पाण्यात..! १२ महिन्यांत दोनदा बदलला अभ्यासक्रम...

रात्री उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, त्यांचे तात्काळ सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी करणारे पत्र विधानसभा अध्यक्षांना ईमेल आणि व्हॉटस्ॲपवरद्वारे आणि त्यांच्या आय मेसेजवरदेखील पाठवण्यात आले आहे. सदस्यत्व रद्द करण्याच्या याचिकेवर लवकरात लवकर बाजू ऐकून घ्यावी, अशी विनंतीही केली आहे. याशिवाय निवडणूक आयोगालाही याबाबत कळवण्यात आले असल्याचे जयंतराव पाटील यांनी सांगितले.

Jayant Patil, Ajit Pawar News
Maharashtra politics : शिंदे गटातील आमदारांनी शिऊन ठेवलेले कोट तसेच; घडले भलतेच : राष्ट्रवादीचेच झाले नऊ मंत्री

महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते शरद पवार यांच्या सोबत आहेत. सर्व जिल्हयातील पक्षाचे अनेक पदाधिकारी समर्थनासाठी बाहेर आले आहे. ९ आमदार म्हणजे पार्टी होऊ शकत नाही. त्यांनी जी शपथ घेतली आहे, ती पक्षाच्या अध्यक्षांना न सांगता केलेली कृती आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीर पावले उचलेल, असे जाहीर केले होते. त्यानुसार पावले आम्ही उचलली आहेत. विधानसभा अध्यक्ष याबाबत आम्हाला लवकरात लवकर सुनावणीला बोलवतील, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com