Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar : अजितदादा आकड्यांचा खेळ करणार; खासदारांची संख्या 'अशी' वाढवणार

NCP Anniversary Day : पूर्वी कॅबीनेट मंत्री म्हणून काम केलेल्या प्रफुल पटेलांना मंत्री करायचे आहे. त्यांना राज्यमंत्री करणे पटत नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत वेगळा निर्णय घेतला पाहिजे, असेही त्यांना सूचवले.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत पाच पैकी फक्त एक जागा जिंकणाऱ्या अजित पवार गटास कॅबिनेट मंत्रि‍पदाची अपेक्षा होती. मात्र त्यांना राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) पदाची ऑफर देण्यात आली. ती नम्रपणे नाकारल्यानंतर मात्र उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जुलैअखेर किंवा 15 ऑगस्टपर्यंत आपले एकूण चार खासदार असतील, असे ठासून सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमोहत्सवी वर्धापन दिनानिमित्त अजित पावर Ajit Pawar बोलत होते. ते म्हणाले, बैठकीत पंतप्रधानांनी सांगितले, की अनेक घटक पक्ष आहेत. त्यामुळे प्रत्येकाला वेळ देता येणार नाही. तुम्हाला मंत्रिपद द्यायचेच आहे. त्यातून त्यांनी राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार आणि एक राज्यमंत्रीपद देण्यात येईल असे सांगितले.

ते मात्र आपण नम्रपणे नाकारले. आपल्याकडे एक लोकसभा आणि राज्यसभेत एक असे दोन सदस्य आहेत. आता तुम्हाला एक शब्द देतो, की जुलैअखेर किंवा 15 ऑगस्टपर्यंत राज्यसभेत 3 सदस्य असतील. लोकसभेत तटकरे प्रांताध्यक्ष म्हणून काम करतील. त्यामुळे आपल्या खादसादांची संख्या वाढणार आहे, असा विश्वासही अजितदादांनी व्यक्त केला.

आपल्याला दिलेल्या मंत्रि‍पदावरूनही फेरविचार करण्याची विनंतीही केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पूर्वी कॅबीनेट मंत्री म्हणून काम केलेल्या प्रफुल पटेलांना Praful Patel मंत्री करायचे आहे. आता त्यांना राज्यमंत्री करणे पटत नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत काहीतरी वेगळा निर्णय घेतला पाहिजे, असेही त्यांना सूचवले. त्यावर त्यांच्याकडून सांगण्यात आले, की तुमच्यासारख्या अनेक पक्षांना स्वतंत्र कारभार दिला आहे.

याला मात्र आम्ही स्पष्ट नकार देत सांगितले, की आम्ही एनडीएच्या बाहेर नाही. तुमच्यासोबतच आहोत. पण आम्ही कुठलेही पद स्वीकारणार नाही. त्याचा मात्र मोठ्या प्रमाणात विपर्यास करण्यात आला. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. परिवार म्हणून राष्ट्रवादी बळकट करूयात, असेही आवाहन केले. तसेच त्यांनी मंत्र्यांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश देत प्लॅनही दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT