Ajit Pawar On Sharad Pawar : पवारसाहेबांचं पक्षासाठी मोठं योगदान; कृतज्ञता व्यक्त करताना अजितदादांचा कंठ दाटला

NCP Anniversary Day : पक्ष स्थापनेनंतर वाढीसाठी अनेकांनी जोरदार काम केले. छगन भुजबळांनी पायाला भिंगरी बांधली. त्यावेळी युतीचे सरकारमधील नेतृत्वाबद्दल काही बोलत येत नव्हते. भुजबळांनी मात्र कुणाचीही मुलाहिजा बाळगता नाही.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमोहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच पवारांना ज्या नेत्यांनी पक्ष वाढवण्यासाठी सहकार्य केले, त्यांचेही आभार मानले. रौप्यमोहोत्सवानिमित्त त्यांनी दिवंगत नेत्यांनाही श्रद्धांजली वाहिली. यावेळी अजितदादा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त अजित पवार Ajit Pawar बोलत होते. ते म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाला बघता बघता 25 वर्षे केली. त्यावेळी राज्यसभेत राम प्रधानांना पराभव झाला होता. काँग्रेसच्या काही आमदारांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यातून काँग्रेसमध्ये राहिलो तर आपल्या नेत्यांना आमदारकी, खासदारकीची तिकिटे मिळणार नाहीत, अशी चर्चा सुरू झाली. यातूनच सोनिया गांधीचा परकीय मुद्दा काढून वरून शरद पवार, तारिक अन्वर, संगमा यांनी अनेकांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, अशी आठवण अजितदादांनी सांगितली.

पक्ष स्थापनेनंतर वाढीसाठी अनेकांनी जोरदार काम केले. छगन भुजबळांनी पायाला भिंगरी बांधली. त्यावेळी युतीचे सरकारमधील नेतृत्वाबद्दल काही बोलत येत नव्हते. भुजबळांनी मात्र कुणाचीही मुलाहिजा बाळगता नाही. पद्मसिंह पाटील, अरुण गुजराथी, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड आदी वरिष्ठ नेत्यांनी पक्ष वाढवला. त्यावेळी आम्ही दुसऱ्या फळीतील नेते होतो. आज रौप्यमोहोत्सवी अनेक नेते आपल्यात नाहीत, याचीही खंत आहे. यात आर. आर. पाटील, दिग्विजय खानविलकर, वल्लभशेठ बनके आदी नेत्यांनी पक्षासाठी मोठे योगदान आहे. त्यांचे स्मरण करून अजित पवारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

यानंर अजितदादांनी शरद पवारांप्रति असलेल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, पक्षाच्या स्थापनेपासून तब्बल 24 वर्षे शरद पवारांनी Sharad Pawar नेतृत्व केले. त्यांनी पक्षाला समर्थ नेतृत्व दिला. त्याबाबत त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतो, असेही अजितादादा म्हणाले. अजित पवारांनी शरद पवारांबाबत असलेली कृतज्ञता व्यक्त करताच सभागृहातील उपस्थितांनी जोरदार टाळ्यांचा गजर केला.

(Edited by Sunil Dhumal)

Ajit Pawar
Supriya Sule : '50 खोके इज नॉट ओके!'; सुप्रिया सुळे यांचा शिंदे, फडणवीस, अजितदादांना टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com