Ajit Pawar
Ajit Pawar sarkarnama
मुंबई

Maharashtra Budget :सीएनजी स्वस्त होणार ; पेट्रोल-डिझेलवरील करात कपात नाही

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अनेक दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे, इंधनावरील करावर कपात करावी, अशी मागणी अनेक दिवसापासून करण्यात येत आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात इंधनावरील कर कमी करण्यात येईल याकडे सगळ्याचे लक्ष होते.

पण पेट्रोल-डिझेलच्या करात सूट देणार नसल्याचे आजच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी सांगितले. तर सीएनजी वरील कर १३.५ टक्क्यावरुन ३ टक्क्यावर आणण्यात आला आहे. त्यामुळे सीएनजी स्वस्त होणार आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. महाविकास आघाडीचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. कृषीक्षेत्र, कृषीसिंचन, पशुवैद्यकीय, पीक कर्ज अशा कृषीक्षेत्रांशी निगडीत बाबींसाठी अधिक तरतूद करण्यात आली.

यंदाच्या अर्थसंकल्पात पीक कर्जात वाढ करण्यात आली आहे. हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. संभाजी महाराज यांचे स्मारक हवेली तालुक्यात उभारण्यात येणार आहे. यासाठी २५ कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली. कृषीक्षेत्र हाच विकासाचा पाया आहे. त्यामुळे कृषी संशोधनासाठी अधिक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

''पीक कर्ज वाटपात वाढ करण्यात येणार आहे. महिला शेतकऱ्यांना नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे. येत्या २ वर्षात १०४ सिंचन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. कोकण, परभणी कृषी विद्यापीठाला ५० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जलसंपदा विभागाला १३ हजार कोटी २५२ रुपये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. १ लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात येणार आहे. तर ६० हजार कृषी पंपाना वीज देणार येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT