Maharashtra Budget 2022 : लता मंगेशकर संगीत स्मारकासाठी अजितदादांची मोठी घोषणा

लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आणि संग्रहालया साठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

Maharashtra Budget 2022 : लता मंगेशकर संगीत स्मारकासाठी अजितदादांची मोठी घोषणा

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत.

मुंबईत कलिनी विद्यापीठाच्या परिसरात लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आणि संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.

भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar)यांच्या स्वप्नातील संगीत महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी शंभर कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर उच्च व तंत्र शिक्षण विभागाची ३ एकर जागा असून त्याच जागेत हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे देशातील आणि राज्यातील पहिले संगीत महाविद्यालय उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येथे केवळ संगीत महाविद्यालयच नाही तर म्युझियम देखील होणार आहे.


Maharashtra Budget 2022 : लता मंगेशकर संगीत स्मारकासाठी अजितदादांची मोठी घोषणा
State Budget: कृषीविद्यापीठ, महिला शेतकऱ्यांसाठी मोठी तरतूद

सरकारच्या वतीने यापूर्वी महाविद्यालयाला दीनानाथ मंगेशकर यांचे नाव देण्यात येणार होते. मात्र मंगेशकर कुटुंबांनी केलेल्या सूचनेनुसार आता या महाविद्यालयाचे नाव 'लता दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालय' करण्याचा निर्णय झाला आहे. जागेचाही प्रश्न सुटला आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर उच्च व तंत्र शिक्षण विभागाची ३ एकर जागा असून त्याच जागेत हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे देशातील आणि राज्यातील पहिले संगीत महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगेशकर कुटुंबियांची नाराजी व्यक्त केली ती म्हणजे, दिवंगत लता मंगेशकर यांच्या नेतृत्वात स्थापन करण्यात आलेल्या समितीने ज्या ठिकाणी शैक्षणिक वातावरण आहे तिथे हे संगीत महाविद्यालय व्हावे अशी शिफारस केली होती. मात्र मुंबई विद्यापीठाने त्यांच्याकडील जागा देण्यास काही अडचणीमुळे नकार दिला. त्यामुळे आता मुंबई विद्यापाठीच्या बाहेर हे संगीत महाविद्यालय होणार आहे. या सोबतच विद्यापीठाने जर त्यावेळी जागा दिली असती तर लता दीदींच्या हयातीत त्यांच्याच हस्ते भूमिपूजन झाले असते, त्यामुळे सर्वांनाच बरं वाटलं असतं, अशी खंतही उच्चतंत्रमंत्री उदय सामंत यांनी नुकतीच व्यक्त केली होती.

महाविकास आघाडीचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. कृषीक्षेत्र, कृषीसिंचन, पशुवैद्यकीय, पीक कर्ज अशा कृषीक्षेत्रांशी निगडीत बाबींसाठी अधिक तरतूद करण्यात आली. अजित पवार म्हणाले, ''यंदाच्या अर्थसंकल्पात पीक कर्जात वाढ करण्यात आली आहे. हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. संभाजी महाराज यांचे स्मारक हवेली तालुक्यात उभारण्यात येणार आहे. यासाठी २५ कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली. कृषीक्षेत्र हाच विकासाचा पाया आहे. त्यामुळे कृषी संशोधनासाठी अधिक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे,''


Maharashtra Budget 2022 : लता मंगेशकर संगीत स्मारकासाठी अजितदादांची मोठी घोषणा
राणे धडधडीत खोटं बोलतात, अमित शाहांना फोन केलाच नाही..

''पीक कर्ज वाटपात वाढ करण्यात येणार आहे. महिला शेतकऱ्यांना नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे. येत्या २ वर्षात १०४ सिंचन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. कोकण, परभणी कृषी विद्यापीठाला ५० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जलसंपदा विभागाला १३ हजार कोटी २५२ रुपये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. १ लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात येणार आहे. तर ६० हजार कृषी पंपाना वीज देणार येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com