Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar : 'आधी माझी चूक साहेब सांभाळून घेत, आता...'; अजित पवार नेमके काय म्हणाले?

Jansanman Yatra In Nashik : जनतेत जाऊन मला माझी भूमिका मांडणे गरजेची आहे. भूतकाळात ठेच लागल्याने भविष्यात ठेच लागू नये, म्हणून यात्रा काढलेली आहे.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्ट आणि सडेतोड बोलतात, अशी ख्याती आहे. ग्रामीण भागातील भाषणात ते अनेकदा मिश्किल टिप्पणीही करतात. त्यामुळे त्यांना कधी कधी फटकाही बसलेला आहे. अखंड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र ज्येष्ठ नेते शरद पवारांनी त्या वेळा निभावून नेल्या. याबाबत अजितदादांनी आता स्पष्टपणे कबुली दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा सुरू झालेली आहे. यावेळी खासगी न्यूज चॅनेलशी संवाद साधताना अजितदादांनी पूर्वीपेक्षा आत्ता आपल्यावरील जबाबदारी वाढल्याने तोलून-मापून बोलत असल्याचे स्पष्ट केले.

लोकसभेनंतर विधानसभेसाठी अजित पवारांनी स्वतःसह आपल्या पक्षाच्या प्रचारातही काही मोठे बदल केले आहेत. यावर विचारले असता अजित पवार म्हणाले, पूर्वी मी ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. वडीलधाऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करताना माझ्यावर मोठी जबाबदारी नव्हती. आता मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने आपोआपच जबाबदारी वाढलेली आहे.

एका पक्षाचा अध्यक्ष असल्याने आता माझ्या प्रत्येक गोष्टीवर लोकांचे बारकाईने लक्ष आहे. यापूर्वी माझ्याकडून एखादी चूक झाली तरी साहेब एखादे विधान करून सावरून घेत होते. आता मात्र मलाच तोलून-मापून बोलावे लागत आहे, अशी कबुलीही अजितदादांनी Ajit PAwar दिली.

लोकसभा निवडणुकीत महायुतीची मोठी वाताहात झालेली आहे. ती स्थिती विधानसभा निवडणुकीत होऊ नये, यासाठी महायुतीतील प्रमुख घटक पक्षांनी खबरदारी घेतल्याचे दिसत आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपापल्या यात्रा काढून मतदारांपर्यंत पोचत आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वातील जनसन्मान यात्रेचा गुरुवारी नाशिकमधून शुभारंभ झाला आहे. मात्र 35 वर्षांपासून राजकारणात असतानाही अजित पवारांना यात्रा का काढावी वाटली, असा प्रश्न विचारण्यात आला.

यावर अजितदादा म्हणाले, जनतेत जाऊन मला माझी भूमिका मांडणे गरजेची आहे. भूतकाळात ठेच लागल्याने भविष्यात ठेच लागू नये, म्हणून यात्रा काढलेली आहे. लोकसभेत थोडक्या मतांनी महायुतीचा पराभव झाला आहे. ती मते वाढवण्यासाठी यात्रा काढल्याचे पवारांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT