Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्यानंतर कोण? अतिरिक्त जिल्हाधिकारी देसाईंची घोडेस्वारी वादात...

Praful Desai UPSC Disability Reservation : पूजा खेडकर यांनी दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर काही अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रावरून वाद निर्माण झाला आहे.
IAS Praful Desai
IAS Praful DesaiSarkarnama
Published on
Updated on

Telangana :  वादग्रस्त ट्रेनी IAS पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राचा वाद ताजा असतानाच इतर काही अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. यावेळी तेलंगणामध्ये आयएएस अधिकारी असलेले प्रफुल देसाई यांच्यावर आरोप होऊ लागले आहेत. त्यांनीही खोटे प्रमाणपत्र देत आरक्षण मिळवल्याचा दावा केला जात आहे.

प्रफुल देसाई हे वर्ष 2019 मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. सध्या त्यांचे घोडेस्वारी, सायकलिंग तसेच इतर साहसी खेळ खेळतानाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. पूजा खेडकर यांचे दिव्यांग प्रमाणपत्र खोटे असल्याचा दावा होत असतानाच देसाई यांच्या या फोटोंनी आरोप होऊ लागले आहेत.

IAS Praful Desai
Kumari Shailaja Vs Deepender Hooda : दोन खासदारांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी कलगीतुरा; काँग्रेसमध्ये फुटू लागले फटाके  

तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यात अतिरिक्त कलेक्टर असलेल्या देसाई यांनी यूपीएससी परीक्षेदरम्यान ऑर्थोपेडिकली दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. पण त्यांच्या फोटोंमुळे दिव्यांग असल्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

IAS Praful Desai
Akhilesh Yadav : 100 आणा, सरकार बनवा..! अखिलेश यादव यांच्या 'मॉन्सून ऑफर'ने वाढवले भाजपचे टेन्शन

देसाई यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहे. एका पायाने आपण अपंग आहे, याचाअर्थ आपण कुठल्याही शारीरिक हालचाली करू शकत नाही, असे नाही. फोटोमध्ये दाखवण्यात आलेल्या गोष्टी प्रशिक्षणाचा एक भाग होत्या. एका पायाला पोलिओमुळे आपण पळू शकत नाही. पण चालू शकतो आणि सायकलिंग करू शकतो, असे देसाई यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना सांगितले.

मी बॅडमिंटन नियमित खेळत नसलो तरी कधी-कधी मित्रांसोबत खेळण्याचा प्रयत्न करतो. एका पायाने पेडल मारून सायकल चालवू शकतो. दुसऱ्या पायाचा आधार घेऊ शकतो. डोंगरांवर ट्रेंकिंग हा आमच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग होता, असे देसाई यांनी म्हटले आहे.

दरम्यान, देसाई हे मुळचे कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबातील आहेत. पाच वर्षांचे असतानाच त्यांच्या उजव्या पायाला पोलिओ झाला होता. आयएएस होण्यापुर्वी हेत कर्नाटक सिंचन विभागात सहायक अभियंता होते. त्यांनी पहिल्यांदा 2017 मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली. 2019 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com