Mumbai News, 17 Feb : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूदिवशी आणि राज्यात त्यांच्या निधनामुळे दुखवटा जाहीर केलेला असतानाच मंत्रालयातील काही निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांनी राज्यातील 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा दिल्याची संतापजनक आणि लाजीरवाणा प्रकार उघडकीस आला आहे.
त्यामुळे अजित पवारांच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडलेला असताना मंत्रालयातून मात्र गुपचूपपणे राज्यातील 75 शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा दिल्याच्या प्रकरणावरून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 75 शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा दिल्याच्या निर्णयाला स्थिगिती देत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले.
अशातच आता या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
तसंच अल्पसंख्याक समाजासाठी असलेला निधी प्रत्येक घटकाला समप्रमाणात आणि पारदर्शकपणे वितरित व्हावा, तसेच विभागाचे कामकाज अधिक लोकाभिमुख व समाजाप्रति उत्तरदायी राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना देखील पवार यांनी या बैठकीत दिल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.