Mahadev Munde : महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी अपडेट! वाल्मिक कराडशी संबंधित दोघांची 'नार्को' तर एकाची 'ब्रेन मॅपिंग' टेस्ट

Parli Mahadev Munde Case Narco & Brain Mapping Test : महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसआयटीने 'नार्को' आणि 'ब्रेन मॅपिंग' टेस्टचा निर्णय घेतला आहे. मागील दोन वर्षांहून अधिक काळ झाला तरी अद्याप मुंडेंच्या हत्येचा तपास पूर्ण होऊ शकलेला नाही.
Mahadev Munde Murder Case
Mahadev Munde Murder CaseSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 17 Feb : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या आणि मागील अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या परळीतील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील दोन संशयीतांची 'नार्को' तर एकाची 'ब्रेन मॅपिंग' टेस्ट मंगळवारी (ता.17) करण्यात येणार आहे.

महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसआयटीने हा निर्णय घेतला आहे. मागील दोन वर्षांहून अधिक काळ झाला तरी अद्याप मुंडेंच्या हत्येचा तपास पूर्ण होऊ शकलेला नाही. तर या तपासाला वेग यावा यासाठी आता आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने वैज्ञानिक चाचण्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

त्यानुसार आज मंगळवारी मुंबईच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत दोघांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट केली जाणार आहे. यापूर्वी तिघांची नार्को टेस्ट पूर्ण झाली असून आज इतर दोघांची नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात येणार आहे.

Mahadev Munde Murder Case
Shiv Jayanti 2026 : पुण्यातील शिवभक्तांसाठी मोठी बातमी! महापौर मंजुषा नागपुरेंच्या आदेशानंतर मिरवणूक मार्गात बदल

एसआयटीने एकूण सात जणांच्या नार्को टेस्टचा प्रस्ताव पाठवला होता. त्यापैकी 6 जणांच्या टेस्टला परवानगी मिळाली आहे. हे सर्व जण महादेव मुंडेंशी आर्थिक व्यवहाराने जोडलेले होते. तर आज होणाऱ्या चाचण्यांमधील दोघे जण वाल्मीक कराडच्या घरात कामाला होते तर तिसरा त्यांचा मित्र असल्याची माहिती समोर येत आहे.

त्यामुळे आता आजच्या नार्को टेस्टमधून तपास यंत्रणांच्या हाती काही ठोस पुरावा लागणार का आणि लागल्यास मुंडेंच्या हत्या प्रकरणाचा तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.

Mahadev Munde Murder Case
Eknath Shinde PA : एकनाथ शिंदेंच्या पीएचे बनावट फेसबुक अकाऊंट, दिला सावधानतेचा इशारा!

कशी झाली हत्या?

20 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांची परळीतील तहसील कार्यालयासमोर निर्घुणपणे हत्या करण्यात आला. मात्र, या हत्ये प्रकरणी अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही. तर भाजप आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडेंची हत्या केवळ 12 गुंठे जमिनीच्या किरकोळ कारणावरून झाली असून यात वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com