Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहाेचले होते. मात्र, अजितदादा सागर बंगल्यावर जाताच तेथे आधीच उपस्थित असलेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर त्या ठिकाणाहून हळूच बाहेर पडले. यामुळे आता 'सागर' निवासस्थानी घडलेल्या या राजकीय नाट्याची एकच चर्चा होत आहे. याबाबतचे वृत्त साम टीव्ही या वाहिनीने दिले आहे. (Latest Marathi News)
अजितदादा आणि गोपीचंद पडळकर यांच्यातला राजकीय संघर्ष सर्वांनाच माहीत आहे. नुकतंच पडळकरांनी अजितदादा यांच्याबाबत अत्यंत वादग्रस्त विधान केले होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होत, पडळकर जिथे भेटतील तिथे पडळकरांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर सागर बंगल्यावर अजितदादा आणि पडळकरांमध्ये घडलेल्या या राजकीय नाट्याची चर्चा आता होत आहे.
आमदार पडळकर यांनी धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. पण, उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन दिले नव्हते. त्याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना, 'अजित पवार हे लबाड लांडग्याचे पिल्लू आहे, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.