NCP Agitation : आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर भाजपने कारवाई करावी!

NCP deemands BJP shall take serious action against Gopichand Padalkar-राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला शहाद्यात मारले जोडे
Gopichand Padalkar
Gopichand PadalkarSarkarnama

Shahada NCP News : आमदार गोपीचंद पडळकर यांनी राजकीय द्वेषातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात अतिशय वाईट विधाने केली. त्यामुळे राज्य सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भाजपने त्यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली. (NCP`s aggressive agitation in Dhule against MLC Gopichand Padalkar)

शहादा (धुळे) (Dhule) येथे राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. पडळकर यांच्याविरोधात भाजपने कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

Gopichand Padalkar
Eknath Shinde News : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ?

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसते नेते अजित पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ शहाद्यात पडळकर यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे तसेच जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन झाले.

या वेळी डॉ. जितेंद्र भंडारी, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष नितीन पवार, पंचायत समिती सदस्य राजेंद्र बाविस्कर, जिल्हा सरचिटणीस विष्णू जोंधळे, माधवराव पाटील, शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, संजय खंडारे, संतोष पराडके, छोटू कुवर, महेंद्र कुवर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Gopichand Padalkar
Nashik NCP News: सरकारने राज्यातील तरुणांचे भवितव्य अंधकारमय केले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com