Ajit Pawar, Anjali Damania  Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Group : सिंचन घोटाळ्याच्या पैशातून 15 कोटींची 80 वाहनं खरेदी केली?; अजित पवारांवर खळबळजनक आरोप

Sachin Fulpagare

Maharashtra Politics Latest News : आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने कंबर कसली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः मैदानात उतरले असून त्यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. तसेच पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना निवडणुकीच्या कामासाठी अजित पवार गटाने 80 गाड्यांचे बुकींगही केले आहे. यात 40 महिंद्रा स्कॉर्पिओ आणि 40 महिंद्रा बोलेरो बुक केल्याचे वृत्त माध्यमांमधून देण्यात आले आहे. यावरून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या जिल्ह्याध्यक्षांना कामासाठी कार देण्यात येणार असल्याची घोषणा केली होते. यानंतर महिंद्रा स्कॉर्पिओ आणि महिंद्रा बोलेरो या गाड्या टेस्ट ड्राइव्हसाठी दाखलही झाल्या आहेत. अजित पवार गटाकडून इतक्या मोठ्या संख्येत गाड्यांची खरेदी होत आहे. यावरून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार गटावर सवाल उपस्थित केला आहे.

अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून अजित पवार गटावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्यांची अजून पक्ष म्हणून घोषणाही झाली नाही त्या पक्षाने इतक्या अफाट गाड्या कशा काय घेतल्या? यासाठी पैसा कुठून आला आणि कोणी देणग्या दिल्या? आता ED, ACB आणि EC ने डोळे मिटून घेतले आहेत का? असे प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हे सगळे सिंचन घोटाळ्यातले पैसे आहेत? का अजित पवारांनी काबाडकष्ट करून कमावलेले पैसे आहेत? कुठून येतात एवढ्या गाड्या? सामान्य माणसाला एक गाडी घेतानाही नाकी नऊ होते, असे म्हणत अंजली दमानिया यांनी अजित पवार गटावर गंभीर आरोप केले आहेत.

80 वाहनांची किंमत होते 15 कोटी, एवढे पैसे आले कुठून?

40 महिंद्रा स्कॉर्पिओ आणि 40 महिंद्रा बोलेरो अशा एकूण 80 वाहनांची किंमत ही 15 कोटी होते. महिंद्रा कंपनीच्या एका स्कॉर्पिओ गाडीची किंमत ही 24.50 लाख आहे. तर बोलेरोची किंमत ही 13 लाख रुपये आहे. या सर्वांची एकूण किंमत ही 15 ते 16 कोटी रुपयांपर्यंत जाते. या गाड्यांची खरेदी करण्यासाठी पैसे अजित पवारांनी दिले की पक्षाने? असा बोचरा प्रश्न अंजली दमानिया यांनी केला आहे.

edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT