Ajit Pawar, Sharad Pawar, Nana Patole Sarkarnama
मुंबई

NCP Ajit Pawar : राज्यात 'महाभूकंप' होणार! शरद पवार गटासह काँग्रेस हादरणार?

Ajit Pawar Group Leader MLA Amol Mitkari Big Statement : महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याची चिन्हे आहेत...

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics Latest News :

महाराष्ट्राला आता राजकीय भूकंप नवीन नाहीत. राज्यातील राजकारणात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सुरू असलेले भूकंप नित्याचेच झाले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदाराने मोठा दावा केला आहे. राज्यात लवकरच आणखी एक राजकीय भूकंप होणार असल्याचे या आमदाराने म्हटले आहे.

राज्यात काँग्रेस पक्षाचे सात आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पाच आमदार लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटात येतील, असा दावा प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. काँग्रेसचे सात आणि Sharad Pawar गटाचे पाच आमदार आमच्या संपर्कात आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे मिटकरी म्हणाले.

काँग्रेसचे 7 आमदार आहेत, तर 5 आमदार हे शरद पवार गटातले आहेत. त्यांची नावेही आता जाहीर करू शकतो, पण आता त्यांची नावे उघड करून त्यांना अडचणीत आणायचे नाही, असे मिटकरी म्हणाले. ( Ajit Pawar News )

बाबा सिद्दिकी यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर झिशान सिद्दिकी यांना युवक काँग्रेसच्या पदावरून हटवण्यात आले. तसेच काल देवगिरीवर शरद पवार गटातील एक बडा नेता येऊन गेला. त्यांचेही नाव आता सांगू शकणार नाही, असे मिटकरींनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजितदादा म्हणतील ते बारामतीत होईल. तिथला सगळा विकास दादांनी केला आहे. तसेच सुनेत्रा वहिनींचाही दांडगा संपर्क बारामतीत आहे. यामुळे सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी द्यावी, अशी आमची मागणी आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत 10 जागा मिळाव्यात, असा आमचा आग्रह असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून काँग्रेसमधील अनेक नाराज नेते आणि आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत किंवा भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

आता हे आमदार आणि नेते कोण यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. दुसरीकडे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय नेते जयंत पाटील हे मुलासह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT