Sanjay Shirsat On Ncp News
Sanjay Shirsat On Ncp News  Sarkarnama
मुंबई

Sanjay Shirsat On Ajit Pawar: राष्ट्रवादीत शरद पवारांपेक्षा अजित पवारांची ताकद मोठी; शिरसाटांचं मोठं विधान!

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. पवार यांना राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी जाहीर पाठिंबा देखील दर्शविला आहे. अजित पवारांसह शरद पवारांनी देखील त्यांच्या भाजप प्रवेशाचं वृत्त फेटाळून लावलं आहे.

मात्र, तरी त्यांच्या नेतेमंडळींकडून अजित पवारांविषयीच्या प्रतिक्रिया राजकीय संभ्रम वाढवणाऱ्या आहेत. याचवेळी आता शिंदे गटाचे नेते व आमदार संजय शिरसाट(Sanjay Shirsat) यांनी मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादीत शरद पवारांपेक्षा अजित पवारांची ताकद मोठी असं शिरसाट म्हणाले आहेत.

संजय शिरसाट यांची शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांसह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. शिरसाट म्हणाले, कालपासून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अजितदादा चर्चेचा विषय आहे. त्याचा फोन नॉट रिचेबल लागणे हे नवीन नाही. अजित पवारां(Ajit Pawar) ची नाराजी पार्थ पवारांच्या पराभवापासून आहे. दादांची नाराजी व आमच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा काही संबध नाही.

शिरसाट म्हणाले,अडीच वर्षानंतर राष्ट्रपती लागवट उठवण्यासाठी पवारांनी दादांना मोहरा केलं. महाविकास आघाडीच्या मेळाव्यात दादांचं स्थान शोधावं लागतंय. टाईम साधणारा नेता त्याला बोलूही दिलं जात नाही. असं काय झालं की नागपूरच्या सभेत दादांना बोलू दिलं नाही. ५४ आमदारांचं पाठबळ असलेल्या नेत्याला साईड केलं जातंय तो त्यांचा अपमान आहे. आघाडीत बिघाडी झालेली आहे. दादा राष्ट्रवादी सोडून आले तर स्वागत आहे असल्याचंही शिरसाट म्हणाले.

दादांच्या येण्याने आमच्यात अस्वस्थता नाही. अजित पवार निघाले तर त्यांची वैचारिक भूमिका स्वतंत्र आहे. सगळ्याच पक्षात चलबिचल आहे. १५ आमदार असलेला पक्ष मार्गदर्शन करत असल्यानं नाराजी. आम्ही उठाव केला तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी सोबत न राहण्याविरोधात ठाम आहेत. आम्हांला कुणाची बदनामी कराची नाही

राष्ट्रवादी पवारसाहेबांनी स्थापन केलेला पक्ष आहे. आमच्याप्रमाणे त्यांचीही नाराजी आता बाहेर पडू लागली आहे. ज्यासोबत जायचं आहे. त्यांच्या भूमिका दादांना स्विकाराव्या लागतील.दादांची ताकद आता राष्ट्रवादीत पवारसाहेबांपेक्षा जास्त वाढलेली आहे.विधानभवनात ज्या पद्धतीने आमदार भेटायला त्यावरून दादांच्या ताकदीचा अंदाज लावावा असंही शिरसाट यांनी सांगितलं.

(Edited by Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT