Pune RTO News: पुणेकरांनो,सावधान! आता विनाहेल्मेट प्रवास करणं महागात पडणार; आरटीओ 'अॅक्शन मोड'वर

Pune RTO In Action Mode: पुणे शहरातील अपघातांबाबत धक्कादायक बाब समोर...
Pune News
Pune NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune Traffic Rules: पुण्यात अपघातांची संख्या सातत्यानं वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आक्रमक पावले उचलली आहेत. आता विना हेल्मेट प्रवास दुचाकीवरुन प्रवास करणं प्रवाशांना महागात पडण्याची शक्यता आहे. कारण शहरातील बेशिस्त वाहनचालकांसह आरटीओकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबत आरटीओने आता सरकारी कर्मचाऱ्यांवरही कारवाई सुरू केली आहे.

आरटीओ(RTO)कडून राज्य आणि केंद्र सरकारच्या कार्यालयात दुचाकीवरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरण्याबाबत आवाहन केले होते. मात्र, याकडे सरकारी कर्मचाऱ्यांनी आरटीओनं या आरटीओच्या आवाहनाकडे पाठ फिरवली. त्यामुळे आता आरटीओकडून विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आरटीओच्या वायूवेग पथकांद्ववारे ही कारवाई करण्यात येत आहे.

Pune News
Sharad Pawar News: ''जे तुमच्या मनात ते आमच्या मनात नाही,कोण काय म्हणतो त्यापेक्षा...''; पवारांकडून चर्चांना पूर्णविराम!

पुणे शहरातील अपघातां(Accident)बाबत धक्कादायक बाब समोर आली होती. यात सर्वाधिक अपघात हे दुचाकीस्वार आणि पादचारी यांच्याशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्येही दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकीस्वारांवर प्रामुख्याने कारवाई करण्यात आली.(Helmet Compulsory In Pune)

Pune News
Ajit Pawar Social Media: आता अजित पवारांच्या सोशल मिडीयावरुन राष्ट्रवादी गायब; नक्की चाललयं काय?

रस्त्यांसह सरकारी कार्यालयात जाऊन तपासणी...

प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे म्हणाले की,सुरुवातीच्या काळात आरटीओच्या वायूवेग पथकांकडून सरकारी कार्यालयांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यात आली. आता प्रत्यक्ष कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. आमचे कर्मचारी जाऊन कोणत्याही सरकारी कार्यालयात तपासणी करीत आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करून दंड टाळावा, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com