Ajit Pawar Latest Marathi News
Ajit Pawar Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

अजितदादा अडिच तास ताटकळत बसले; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पोहचले नाही : अन्...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मंत्रालयामध्ये एका कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) पोहचले होते. पवार यांनी अडीच तास वाट पाहून सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आले नाही. त्यानंतर अजित पवार कार्यक्रम स्थावरुन निधून गेले.

फिफाच्या लोगो अनावरण सोहळ्यासाठी पवार यांनी उपस्थिती लावली होती. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची मंत्रिमंडळ बैठक लांबल्याने दोघेही कार्यक्रमाला वेळेत पोहचू शकले नाही. ज्यामुळे अजित पवारांना जवळपास अडीच तास वाट पहावी लागली. दरम्यान, तीन तास होऊनही कार्यक्रम सुरु न झाल्याने पवार मंत्रालयातून निघून गेले. पवार निघून गेल्यानंतर संबधित कार्यक्रम सुरु झाल्याचे दिसून आले.

आज ( ता. 21) दुपारी 12 वाजता फिफा स्पर्धेसाठीचा लोगो अनावरणाचा कार्यक्रम होता. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार होते. कार्यक्रम दुपारी 12 वाजता सुरु होणार, अशी माहिती मिळाल्याने पवार वेळेत मंत्रालयात पोहोचले. दुसरीकडे मंत्रिमंडळ बैठक सुरु असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी येऊ शकले नाही.

त्यामुळे पवार यांनी माहिती संपर्क सचिवांकडे वाट पाहिली. जवळपास तीन तास उलटल्यानंतरही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री न आल्याने अखेर पवारांनी तेथून काढता पाय घेतला. यावेळी त्यांनी कार्यक्रमाशी संबधित काही अधिकाऱ्यांना भेटून नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, या प्रश्नावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, एखाद्या कार्यक्रमाला उशीर होत असतो. जनतेच्या हितासाठी बैठकीत निर्णय घेत असताना उशीर होतो. कार्यक्रम हे वेळेतच झाले पाहिजेत. मात्र, मविआच्या काळात चर्चा होत नसल्याने ते वेळेत पोहोचत होते, असा टोला पवारांना लगावला. अजित पवार नाराज होतात म्हणजे 'अल्बर्ट पिंटो को इतना गुस्सा क्यू आता है' असेही मुनगंटीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT