उद्धव ठाकरेंचा प्लॅन; संजय राठोडांना बालेकिल्ल्यातच बसणार मोठा धक्का?

शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) लवकरच राज्याचा दौरा करणार आहेत
Uddhav Thackeray, Sanjay Rathod
Uddhav Thackeray, Sanjay Rathodsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेमध्ये (Shivsena) उभी फुट पडल्यामुळे पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मैदानात उतरले आहेत. प्रत्येक मतदार संघात शिवसेनेची ताकद उभा निर्माण करण्यासाठी ठाकरे प्रयत्न करत आहेत. त्यातच ते आता मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.

संजय राठोडांचे राजकीय बस्तान बसले, तिथेच एंट्री करण्याची तयारी ठाकरे यांनी केली आहे. राठोडांना बालेकिल्ल्यातच चारीमुंड्या चीत करण्याचा मास्टर प्लॅन त्यांनी तयार केल्याचे सांगितले जात आहे. पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यूने राठोडांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडात सहभागी होत राठोडांनी ठाकरेंची साथ सोडली.

त्यामुळे राठोडांना मतदारसंघातच घेरण्यासाठी शिवसेनेकडून फिल्डींग लावली जाते आहे. त्यासाठी थेट राठोडांच्या सत्तास्थानावर घाव घालण्याची रणनिती ठाकरेंकडून आखली जात आहे. उद्धव ठाकरे दसऱ्यानंतर राज्यभरात महाप्रबोधन यात्रा काढणार आहेत. याचदरम्यान बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी गडालाही ते भेट देणार आहेत. इथे उद्धव ठाकरे मोठे शक्तिप्रदर्शन करणार असल्याचेही सांगितले जात आहे.

पोहरादेवी गडाला आणि येथील महंतांना बंजारा समाजात मोठे महत्त्व आहे. महंतांशी जवळीक साधून अनेकांनी स्वतःच राजकीय बस्तान बसवले आहे. राठोडांचे मंत्रिपद गेले होते, तेव्हा त्यांना पुन्हा मंत्री करण्यासाठी महंतांच्या माध्यमातून ठाकरेंकडे लॉबिंग करण्यात आले होते. आता यापैकीच 3 महंत शिवबंधन बांधून राठोडांना धक्का देणार असल्याची चर्चा आहे.

पाचपैकी तीन महंत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात 'मातोश्री'वर शिवबंधन बांधून घेणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच मोठ्या संख्येने बंजारा समाजबांधवही शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर करणार असल्याचे, महंत सुनील महाराज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. राठोडांना मतदार संघात घेरण्यासाठी आणि बंजारा समाजाची ताकद शिवसेनेसोबत ठेवण्यासाठी महंतांचा शिवसेना प्रवेश महत्वाचा आहे. महंत जितेंद्र महाराज यांनी शिवबंधन बांधणार ही अफवा असल्याचे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com