ajit pawar
ajit pawar sarkarnama
मुंबई

महापालिका निवडणुका लगेचच होतील ; गाफील राहू नका, अजितदादांचा सल्ला

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : महापालिका निवडणुका (municipal elections)सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या असताना पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार(ajit pawar)यांनी ''पुढील काही दिवसातच निवडणूका जाहीर होतील,'' असे जाहीर केले. अजित पवार आज शिवणे येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

''निवडणूका सहा महिने पुढे गेल्या. असे काही सांगता येत नाही. प्रभाग तीन सदस्यांना ऐवजी दोनचा होईल का, सदस्य संख्या तीनचीच राहणार. पालिकेची आज मुदत संपत असल्याने निवडणुक होईपर्यंत लढणाऱ्यांना थोडा खर्च जास्त करावा लागणार आहे. पुढील काही दिवसात, महिन्यात एकदम अचानक निवडणूक जाहीर होतील. हे मी सांगतो. पुन्हा मला दोष देऊ नका. नाहीतर म्हणाल आम्हाला फसवलं राव, म्हणून मी सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी सांगतो की, तुम्ही गाफील राहू नका,'' असे पवार म्हणाले.

पवार म्हणाले, ''इतर मागासवर्गीय समाजाला (obc) पण न्याय मिळाला पाहिजे. त्याकरीता आमचा खटाटोप आहे. या संदर्भातील विधेयक एकमताने सभागृहांमध्ये मंजूर झाले आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाने दोघांनी पण त्याला पाठिंबा दिला. राज्यपाल महोदयांनी पण त्याच्यावर सही केलेली आहे. परंतु शेवटी सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आहे. त्यामुळे पुढे कदाचित कोणी कोर्टामध्ये जाऊ शकतात. कोर्टाचा निर्णय अंतिम असतो. पण तुम्ही कृपा करून सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी सांगतो की, तुम्ही गाफील राहू नका. येत्या काही दिवसात, महिन्यात एकदम अचानक निवडणूक जाहीर होतील. प्रभागाच्या हरकती- सूचना निवडणूक आयोगाकडे गेलेले आहेत. आणि कदाचित तुम्ही फिरायला जाणार. निवडणुक लढणाऱ्याला थोडा खर्च जास्त करावा लागणार आहे. कारण निवडणुकीला किती दिवस आहे. ते आता सांगता येणार नाही,''

''सध्या राजकीय वातावरण गढूळ झालेले आहे. विकासाच्यापेक्षा एकमेकांची उणीदुणी काढणे. एकमेकांना नोटिसा पाठवण सुरू आहे. हे कधी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होते का, तुम्ही पण कधी बघीतल असेल. सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनी चालू ठेवलेली परंतु आताचे वातावरण वेगळे आहे. काही लोक ज्यांची योग्यता पात्रता नाही. ते तर एवढ्या मोठ्या माणसांच्या बद्दल काय बोलतात काय, करतात काय, त्याचा मागमूस राहिलेला नाहीये. माझं म्हणणं प्रत्येकाने आधी स्वतःपासून वडील- धाऱ्यांचा आदर ठेवला पाहिजे. ही आपली संस्कृती, आपली परंपरा आणि तो आदर ठेवून आपण पुढे गेले पाहिजे,'' असे पवार म्हणाले.

जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके, नगरसेविका सायली वांजळे, बंडू गायकवाड, काका चव्हाण, माजी आमदार कुमार गोसावी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीरंग चव्हाण, शिवसेनेचे मतदारसंघ प्रमुख नितीन वाघ, शुक्राचार्य वांजळे, त्रिंबक मोकाशी, शेखर दांगट, विकास दांगट, प्रविण शिंदे, राहुल घुले, सुरेश गुजर, अतुल दांगट यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT