काही लोक जेलमध्ये पत्रकार परिषद घेतील ; राऊतांचे नाव न घेता मनसेचा पुन्हा हल्लाबोल

राज ठाकरेंनी राऊतांची नक्कल केली होती.राऊत विरुद्ध मनसे (mns)असा नवा संघर्ष पुढील काळात पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Sanjay Raut, Sandeep Deshpande
Sanjay Raut, Sandeep Deshpandesarkarnama
Published on
Updated on

पुणे : शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut)हे सध्या मनसेच्या निशाण्यावर आहेत. मंगळावारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राऊतांवर केला होता. ''राऊतांनी आता एकांतात बोलण्याची सवय लावून घ्यावी,'' असा टोला राज ठाकरेंनी लगावला होता. तर पुण्यातील कार्यक्रमात राज ठाकरेंनी राऊतांची नक्कल केली होती. त्यामुळे राऊत विरुद्ध मनसे (mns)असा नवा संघर्ष पुढील काळात पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजप, भाजपचे नेते यांच्यावर संजय राऊत सकाळी पत्रकारांसमोर येऊन टीका करीत असतात, यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande)यांनी आज पुन्हा त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. राऊतांचे नाव न घेता देशपांडेनी राऊतांची खिल्ली उडवली आहे.

''जेलमध्ये गेल्यावर काही लोक घरच जेवण मागतात काहीना पुस्तक लागतात, काहीना औषध लागतात, या पुढे काही लोक जेल मध्ये सकाळची पत्रकार परिषद घ्यायची परवानगी मागतील,'' अशा शब्दात देशपांडेंनी राऊतांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS)सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेना आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांना टोमणा लगावला आहे. देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी टि्वट करीत राऊतांवर हल्लाबोल केला आहे. ''उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशानंतर "सामना कार"रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थीसाठी रवाना. "झुकेगा नहीं साला",'' असे टि्वट शनिवारी करीत संदीप देशपांडेंनी संजय राऊतांची खिल्ली उडवली आहे.


Sanjay Raut, Sandeep Deshpande
''बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की राऊत'' मुश्रीफांची टोलेबाजी

पु्ण्यात नुकत्याच झालेल्या मनसेच्या वर्धापन दिनी राज ठाकरेंनी राऊतांवर तोडसुख घेतले. त्यांची नक्कल केली. ‘ते संजय राऊत… किती बोलतात. सगळ्यांची एक अॅक्शन असते. चॅनल लागले की हे सुरु, कॅमेरा हटला की सगळे नॉर्मल होतात. एकदा असाच एका सभेला गेलो होतो. सगळे साधं व्यवस्थित बोलत होते. तेवढ्यात त्यांच्या नावाची घोषणा नाही. मी आलो.. भाषण करतो.. म्हटले ये. आज.. इथे जमलेले सर्व..अरे आता नीट बोलत होता. काय प्रॉब्लेम झाला. डोळे मोठे करणार, भुवया उडवणार.. किती बोलतो. प्रश्न बोलायचा नाही. आपण काय बोलतो हे आहे, कसे बोलतो हे आहे. भविष्यातल्या महाराष्ट्रातल्या पिढ्या बघत आहेत हे. ते उद्या काय शिकणार? असा सवाल करत राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com