NCP News : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदार, मंत्री यांच्यासह आज (सोमवार) पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आदी मंत्र्यांनी रविवारीच पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या गोटातील आमदार शरद पवारांची भेटीला गेले .
या भेटीबाबत अजित पवार गटातील मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. ते माध्यमांशी बोलत होते. "मी कालच पवार साहेबांची भेट घेतली होती, पवारसाहेब आमचे नेते आहेत, आम्ही त्यांच्या सोबत आहोत," अशा शब्दात वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया देत साहेब आमचे नेते असल्याचे सांगितले.
अजित पवार व त्यांचे आमदार यशवंतराव चव्हाण सेंटरवर पोहोचले तेव्हा शरद पवार सिल्व्हर ओक या आपल्या निवासस्थानी होते. तेथून ते थेट वाय बी सेंटरमध्ये पोहोचले आहेत. तेथे ते अजित पवार व त्यांच्या समर्थक आमदारांशी चर्चा झाली. सध्या सुरु असलेले पावसाळी अधिवेशन, राष्ट्रवादी फुटल्यानंतर दोन्ही गटांचे व्हीप यामुळे दोन्ही गटाकडे राजकीय पेच निर्माण झाला आहे.
दरम्यान आज विधान परिषदेचे अधिवेशन सुरू झाले. आमदार मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि विप्लव बजोरिया यांना अपात्र करण्याची मागणी विधिमंडळ सचिवांकडे केली आहे. त्यामुळे आता या पत्रावर विधिमंडळ सचिव नेमका काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
काही दिवसांपूर्वी या तिन्ही आमदारांनी ठाकरे गटाचे नेतृत्व असलेले उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वार टीका केली होती. पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणावर देखील या तिन्ही आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. ज्यानंतर ठाकरे गटाला आणखी तीन मोठे हादरे बसले होते.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.