Maharashtra Monsoon Session : बोगस बियाणे प्रकरणावर कारवाई करणार ; सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी; फडणवीसांची ग्वाही

Fadnavis Anouncement for Farmers: हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या विविध मदतीपोटी देण्यात आले आहेत.
Maharashtra Monsoon Session 2023
Maharashtra Monsoon Session 2023 Sarkarnama
Published on
Updated on

Bogus Seeds Scam News: पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गाजला. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडला होता, तो प्रस्ताव अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी फेटाळला.

त्यानंतर विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोगस बियाणे प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. संबधितांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा फडणवीस यांनी दिला. "दुबार पेरणीची वेळ आली तर त्यासाठी कन्टेजन्सी प्लान तयार करण्यात आला आहे," असं फडणवीस म्हणाले.

"राज्यात काही भागात पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. मागील काळात ज्या पेरण्या झाल्या होत्या. त्याच्यापैकी 80 टक्के पेरण्या झाल्या आहेत. पुणे विभागात कमी प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. नाशिक विभागातील काही भागात पेरण्या कमी आहेत. आयएमडीने दाखवलेल्या अहवालानुसार, पुढील येणाऱ्या काळात पेरण्या योग्य पद्धतीने होतील. याबाबत एक प्लान देखील तयार करण्यात आला आहे," असे फडणवीस यांनी सांगितले.

Maharashtra Monsoon Session 2023
Maharashtra Monsoon Session LIVE थोरातांचा प्रस्ताव नार्वेकरांनी फेटाळला ; शेतकऱ्यांच्या मुद्यांवरून विरोधक आक्रमक

खतं आणि बोगस बियाणांवर कारवाई करण्यात येणार आहे. रविवारी यासंदर्भात कायदा अधिक कडक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने नव्याने ज्याप्रमाणे बीटीचा कायदा केला. ज्याठिकाणी बियाणं फेल झाल्यानंतर त्या कंपन्यांवर थेट कारवाई करता येते. तशा प्रकारे इतर बियाणांकरीताही कायदा करत आहोत. बोगस खतांबाबत असेन्शीअल कमोडीटी अॅक्टनुसार, त्यांच्यावर कारवाई करता येऊ शकते. त्यामुळे तो नॉन बेलेबल गुन्हा होईल. हा देखील निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतला आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Maharashtra Monsoon Session 2023
Rahul Kalate Shinde Group News: अमावस्येमुळे राहूल कलाटेंचा प्रवेश तूर्तास अडला..; कलाटेंच्या मनात शिंदेच होते..

फडणवीस म्हणाले, "आम्ही या पूर्ण परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. कुठल्याही परिस्थितीत हे सरकार शेतकऱ्याच्या पाठिशी उभं राहील. हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या विविध मदतीपोटी देण्यात आले आहेत. जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. फक्त पन्नास हजार शेतकरी बाकी आहेत. त्यांचं केव्हायसी न झाल्यामुळे हे सगळं झालं आहे. याची विरोधी आणि सत्तारुढ पक्षाला चिंता नाही, अशी परिस्थिती नाही,"

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com