Ajit pawar On Home Minister Post
Ajit pawar On Home Minister Post  Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar News : अजितदादांना गृहमंत्रीपद न मिळाल्याची खंत वाटते का?

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Aseembly : महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्रीपद न मिळाल्याने आताचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांना आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 'राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ हे नेते गृहमंत्रीपदी विराजमान झाले, मात्र मला गृहमंत्रीपद मिळाले नाही,'असे सूचकपणे अप्रत्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, आता यावरून चर्चा होत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विधानसभेत बोलत असताना हा मुद्दा उपस्थित झाला. फडणवीस बोलताना त्यांना रोखत अजित पवार म्हणाले की, "ओळीने आमचे तीन नेते गृहमंत्री झाले. पण, मलाच गृहमंत्रीपद मिळाले नाही, असे अजित पवार म्हणाले. यानंतर सभागृहात हास्य फुसत, वातावरण हलकं फुलकं झालं होतं.

दरम्यान अजित पवार यांनी सरकारवर टिका केली होती, देशासह जगभरात महिला दिन साजरा केला जात आहे. पण एवढा मोठा आपला महाराष्ट्र आहे. पण तिथे जागतिक महिला दिनाच्या दिवशी मंत्रिमंडळात एकही महिला नाही. हे महाराष्ट्र सरकारला शोभत नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारचे कान टोचले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT