Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar News: पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच अजित पवारांचा विरोधकांवर गंभीर आरोप;म्हणाले,'खोटा नरेटिव्ह..'

Monsoon Session Of Maharashtra Legislature : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून कारभार स्विकारल्यापासून आजतागायत कधीही अधिवेशन गुंडाळलं नाही. प्रत्येकाचं उत्तर राज्य सरकारकडे आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : महाराष्ट्राच्या विधिमंडळांचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून (ता.27) सुरू होत आहे.विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच हे अधिवेशन होत आहे. शिंदे- फडणवीस- पवार सरकारचं हे शेवटचं अधिवेशन असल्याने ते वादळी ठरण्याची शक्यता आहे.या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर मोठा गंभीर आरोप केला आहे.

पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी महायुतीला घेरण्यासाठी विरोधकांनी मोठी तयार केली आहे. याच पार्श्वभूमीवरच विरोधकांनी सत्ताधारी पक्षाच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे.तसेच सरकारला प्रश्नांची सरबत्ती करणारं निवेदनही दिले आहे.त्यात अजित पवारांनी (Ajit Pawar) देखील उद्यापासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाआधीच विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

अजित पवार म्हणाले,विधिमंडळ अधिवेशनापूर्वीची पत्रकार परिषद आपण घेत असतो. उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे आणि हे शेवटचं अधिवेशन असणार आहे.अधिक प्रश्न सोडवण्यात यावे हे महायुतीचे प्रयत्न राहणार आहेत. चहापानाकरिता सर्वांना बोलवत असतो.पण बरेच वर्ष नेहमीप्रमाणे विरोधक चहापानाला येत नाहीत.

आजदेखील त्यांनी एक पत्र दिले आहे.त्यात मनुस्मृतीच्या श्लोकाने सुरुवात केली आहे.असं काही करण्याची गरज नव्हती. पत्राच्या सुरुवातीला मनुस्मृतीच्या श्लोकाचा वापर केला आहे.त्याची काही गरज नव्हती असंही त्यांनी सांगितले.

पवार म्हणाले, जाणीवपूर्वक एक नरेटिव्ह सेट करुन जातीत तेढ निर्माण करण्याचं राजकारण विरोधक करत आहेत.आमचा या मनुस्मृतीला विरोध आहे.आज शाहू महाराजांची 150 वी जयंती आहे.मनुस्मृतीसारख्या मुद्द्याला या महाराष्ट्रात स्थान नाही. सभागृहात अनेक मुद्यांवर चर्चा होईल. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री म्हणून कारभार स्विकारल्यापासून आजतागायत अधिवेशन कधीही गुंडाळलं नाही. प्रत्येकाचं उत्तर राज्य सरकारकडे आहे. त्यांनी काय करावं हा लोकशाहीचा अधिकार आहे.पण राज्य सरकार सर्व प्रश्नांना उत्तर देईल.28 जूनला अर्थसंकल्प सादर होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्यापासून अधिवेशानाला सरकार सामोरे जात आहे.आज विरोधीपक्षाने प्रथेप्रमाणे चहापानावर बहिष्कार टाकत जे पत्र दिले आहे. खोट बोल पण रेटून बोल असं विरोधकांचं सुरू आहे.खोटे नरेटिव्ह तयार करुन आता खोटचं बोलायचं अशा मानसिकतेत विरोधीपक्ष गेला आहे. पण त्यांनी आमच्यावर आरोप करण्याआधी स्वत:चा चेहरा आरशात बघावं असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT