Shadow PM Rahul Gandhi : राहुल गांधींना का म्हटलं जाईल ‘शॅडो PM’? मोदींनी शपथ घेतलेल्या दिवसापासून मिळणार मान...

Congress Leader Rahul Gandhi Opposition Leader in Lok Sabha : राहुल गांधी यांना 9 जूनपासून विरोधी पक्षनेतेपदाच्या सर्व सुविधा मिळणार असल्याचे लोकसभा सचिवालयाने स्पष्ट केले आहे.
Rahul Gandhi, PM Narendra Modi
Rahul Gandhi, PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रुपाने मागील दहा वर्षानंतर पहिल्यांदाच लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला. या पदाला असलेला मान आणि शान वेगळीच असते. सरकारच्या सर्व महत्वाच्या समितीच्या विविध सरकार संस्थांच्या प्रमुखांच्या पदांवर नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेत या नेत्याची भूमिकाही महत्वाची मानली जाते.

विरोधी पक्षनेता म्हणजे ‘शॅडो प्राईम मिनिस्टर’ असे म्हटले जाते. संसदेत या नेत्याला असलेला मान तसेच त्यांच्या भूमिकेची ताकदही मोठी असते. हा मान राहुल गांधी यांना मिळणार आहे. लोकसभेमध्ये पंतप्रधान ज्याप्रमाणे सरकारची बाजू मांडत असतात, त्याप्रमाणे विरोधी पक्षनेता न पडणाऱ्या निर्णयांविरोधात आवाज उठवतात.

Rahul Gandhi, PM Narendra Modi
Lok Sabha Session Live : लोकसभेत 'आणीबाणी' अन् क्षणात बदललं वातावरण; विरोधक अध्यक्षांवर तुटून पडले...

विरोधी पक्षनेता अनेक संयुक्त संसदीय समित्यांमध्ये असतो. राहुल गांधी विरोधी पक्षनेते बनल्याने आता पंतप्रधान मोदींसोबत बसून विविध संस्थांच्या प्रमुखांच्या निवडीतही आपली भूमिका बजावू शकतात. आतापर्यंत एकाही पॅनेलमध्ये राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी एकत्रित नव्हते.  

निवडणूक आयुक्त, ईडी, सीबीआयचे संचालक, केंद्रीय सतर्कता आयोगाचे अध्यक्ष, मुख्य माहिती आयुक्त, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष अशा काही प्रमुखांच्या नियुक्त्यांमध्ये राहुल गांधींची महत्वाची भूमिका राहणार आहे. या नियुक्त्यांवरून सातत्याने वाद झाले आहेत. या सर्व पदांची निवड एका पॅनेलद्वारे केली जाते. त्यामध्ये पंतप्रधानांसह विरोधी पक्षनेत्यांचा समावेश असतो.

Rahul Gandhi, PM Narendra Modi
Rahul Gandhi in Lok Sabha : है तैयार हम! राहुल गांधींनी लोकसभेतील पहिल्याच भाषणात भरला दम

9 जूनपासूनच मिळणार मान

लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपदाचा मान 9 जूनपासून मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याचदिवशी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. तसेच मोदींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधीही या दिवशी झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com