Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. त्यावेळी अजित पवार हे 40 पेक्षा आमदारांना सोबत घेऊन महायुतीत दाखल झाले होते. महाराष्ट्राचं राजकारण फिरवणाऱ्या शरद पवारांसाठी हा मोठा धक्का होता. यानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हही अजित पवारांना मिळाले. तर शरद पवारांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि तुतारी हे चिन्ह बहाल करण्यात आलं होतं.
याचवेळी राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) या दोन्ही गटांतला संघर्ष दिवसागणिक अधिक टोकदार होत चालला आहे. तसेच अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चाही जोर धरू लागल्या आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्रिपदाविषयी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले,'मला मुख्यमंत्री बनायचं आहे. पण माझी गाडी उपमुख्यमंत्री पदावरच अडकली आहे. गाडी पुढे जावी याचा मी प्रयत्नही करतोय. पण संधीच मिळत नाही', असं एकाचवेळी अजितदादांनी मनातली इच्छा आणि खंत दोन्हीही बोलून दाखवल्या.
यावेळी त्यांनी आपले काका शरद पवारांविषयी (Sharad Pawar) महत्त्वाचं विधान केलं आहे. ते माझे मोठे काका आहेत. मी त्यांना काय बोलणार? मी त्यांच्या डोळ्यांत डोळे घालूनही पाहू शकत नाही. मी मान खाली घालेन असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे.यामुळे राजकारणात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाविषयी अगदी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,आपल्याला मुख्यमंत्री बनायचं आहे.पण काय करणार? आमची गाडी तिथेच अडकते. मी प्रयत्न करतो की, ती गाडी पुढे जावी. पण संधी मिळत नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2004 मध्ये मुख्यमंत्रिपदाची एक संधी आली होती. पण पक्षाच्या नेतृत्वाने ती संधी गमावली. जो कुणी त्या खुर्चीवर बसतो, त्यांना ती खुर्ची चांगली वाटते.त्याच दृष्टिकोनातून प्रत्येकानं प्रयत्न,आणि काम करायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
मुख्यमंत्रिपदाची खुर्ची एकच आहे. जो 145 चा आकडा मिळवणार, त्याच्याच पक्षाचा मुख्यमंत्री बनणार. माझी महत्त्वकांक्षा काय आहे, ते मी आता बोलणार नाही. आमचं लक्ष्य हे महायुतीच्या रुपाने पुन्हा सत्तेत येणं हे आहे असल्याचंही अजितदादांनी ठणकावून सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.