Laxman Hake Video : मनोज जरांगेंच्या पाठोपाठ लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय, उपोषण स्थगित पण...

Obc reservation Laxman Hake : लक्ष्मण हाके हे देखील जरांगे उपोषण करत असलेल्या अंतरवाली सराटीपासून जवळील वडगोद्री येथे उपोषण करत होते. त्यांनी देखील आज (बुधवारी) आपले उपोषण स्थगित केले आहे.
Laxman Hake
Laxman HakeSarkarnama
Published on
Updated on

Laxman Hake News : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आज (बुधवारी) आपले उपोषण स्थगित केले. जरांगे पाटील यांचा डाव आम्ही यशस्वी होऊ दिला नाही, असा दावा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला. हाके हे देखील जरांगे उपोषण करत असलेल्या अंतरवाली सराटीपासून जवळील वडगोद्री येथे उपोषण करत होते. त्यांनी देखील आज आपले उपोषण स्थगित केले आहे.उपोषणाच्या ७ व्या दिवशी वडीगोद्री येथे ओबीसी महिला आणि मुलींच्या हाताने पाणी घेऊन हाकेंनी उपोषण सोडले आहे.

हाकेंनी उपोषण सोडले असली तरी त्यांनी उपोषण सोडण्याच्या आधी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. 'आम्ही महाराष्ट्र शासनाला रोखले आणि जिथून या आंदोलनाची सुरुवात झाली, ज्या बेकायदा मागण्याला सुरुवात झाली, त्याच वेशीत जरांगे पाटील नावाचं घोड आम्ही अडवलं आणि असं तसं नाही, तर ते जागेवर थांबवलं.' असे हाके म्हणाले. हाके विरुद्ध जरांगे वाद पेटण्याची चिन्ह आहेत.

Laxman Hake
Ambadas Danve News : अमित शहांचा तीस जागा जिंकण्याचा दावा, ठाकरे गटाचा नेता म्हणतो शक्यच नाही

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करताना देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला. आपण आचारसंहिता लागू होईपर्यंत राजकीय भूमिका घेणार नाही. मात्र, तोपर्यंत मराठा समाजा तुमची वाट पाहतो आहे. तुम्ही मराठा समाजाला आरक्षणा द्या नंतर माझ्याकडे येऊ नका असे जरांगे म्हटले होते.

जरांगेंची खिल्ली उडवत हाके म्हणाले, ते उलटं करायचं ? की पालट करायचं ? का माघारी घालवायचं ? की अरबी समुद्रात घालायचं ? यामध्ये आम्ही सक्सेस झालो आहोत. ब्राह्मणांची भीती घालून आम्हा बहुजनांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचे काम कोणी केलं? हे आम्हाला सांगायला लावू नका, त्यात मेलेली मढी उकरून काढावी लागतील. जुन्या नेत्यांची सगळी धोरणं काढावी लागतील.

Laxman Hake
Siddaramaiah : सिध्दरामय्या यांच्याभोवतीचा फास आवळला; कोर्टाच्या आदेशाने धाबे दणाणले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com