Ajit Pawar On Mahananda Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar On Mahananda : 'महानंदा' कुणाच्या घशात घालण्याचा प्रश्नच नाही'; अजितदादा स्पष्टच बोलले!

Ajit Pawar On Mahananda Milk Dairy : उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला, असा प्रकार करण्याचा काहींचा प्रयत्न आहे.

Chetan Zadpe

Mumbai News : राज्यातील उद्योग गेल्या काही दिवसांपासून राज्याबाहेर जात आहे, असे विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर नेहमी टीका केली जाते. शेतकऱ्यांच्या जोडधंदा असलेला दुग्ध व्यवसायही राज्याबाहेर जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. महानंद डेअरी प्रकल्प हा राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे (NDDB) देण्यासाठीच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरू आहेत. यामुळे विरोधकांनी 'हा राज्य सरकारचा निर्णय हा गुजरातला पायघड्या घालण्यासारखे असल्याचा आरोपही केला. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर टीका केली आहे. (Ajit Pawar On Mahananda)

मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवार म्हणाले, "विरोधापक्षांमध्ये खरं तर काही त्राण राहिलेले नाही. काहीतरी आरोप करायचे. महानंदबाबत सातत्याने विरोधीपक्षांकडून खोटं बोललं जातं आहे. महानंद गुजरातला देऊन टाकलं, राज्याचं महानंद गुजरातच्या दावणीला बांधलं जातंय, असे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत."

"महानंदची जागा मुंबईतील गोरेगावमध्ये आहे. ती आपल्या सरकारचीच जागा आहे. महानंदाला दिलेली जागा आहे. एनडीडीटी ही देशात दूग्ध क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. मागे एकदा जळगाव दूधसंघ एनडीडीटीने चालवायला घेतलेला होता. तो चांगला चालायला लागल्यानंतर पुन्हा तो जळगाव दूध संघाकडे आला. आता दुध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधीकडून तो चालवतात, असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले.

"यामध्ये जाणीवपूर्वक आमच्यावर आरोप केले जात आहेत. 'महानंदा' कुणाच्या तरी घशात घालतोय. हे धादांत खोटं आहे. कसलीही माहिती न घेता उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला, असा प्रकार करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. यात काही तथ्य नाही. महानंदाचा अजून करारसुद्धा झालेला नाही. केवळ चर्चा झालेली आहे. सगळ्यांनी राजीनामे दिलेले आहेत. आता त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर मंत्रि्मंडळ त्याबाबत निर्णय घेईल," असे अजित पवार म्हणाले.

मनोज जरांगेंना खडसावलं -

"राज्याची कायदा सुव्यवस्था राखावी असा आमची भूमिका आहे. दोन वेळा आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा प्रयत्न केल, पण कोर्टात टिकलं नाही. त्यामुळे आता बारकाईने आणि कसलीही त्रुटी न राहता आता आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. मात्र आज जाणीवपूर्वक काही वक्तव्ये केली जात आहेत . मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांबद्दल शिवराळ भाषा वापरली जाते. कुणी असं समजू नये की काहीही बोललो तरी खपतं, असं होणार नाही," असा इशारा अजित पवारांनी (Ajit Pawar) जरांगेंना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT