Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar News : सुप्रिया सुळे अन् प्रफुल्ल पटेलांच्या निवडीनंतर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली.

सरकारनामा ब्यूरो

NCP Foundation Day : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. या नव्या जबाबदारी सह सुप्रिया सुळे यांच्याकडे पंजाब, हरियाणा महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्तीवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पेटेल (Praful Patel) यांच्या नियुक्तीनंतर अजित पवार यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये अजित पवार म्हणाले, ''राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली.''

''तसेच प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के. के. शर्मा, पी. पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे.''

''आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली 'हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…' हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचे योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयाने काम करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन!'' असे अजित पवार म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT