Sunetra Pawar, Ajit Pawar, Supriya Sule Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar : 'सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं'; अजितदादांना मोठी खंत

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : गत लोकसभा निवडणुकीत राज्यासह देशाचे बारामतीवर लक्ष होते. या निवडणुकीच्या माध्यमातून ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आमने सामने होते. येथे खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली. यात सुप्रिया सुळेंचा दीड लाख मताधिक्याने विजय झाला.

मात्र ही नणंद-भावजय अशी झालेली लढत नको व्हायला होती, अशी खंत अजित पवारांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केली.

राज्यात सध्या लाडकी बहीण योजना चांगलीच गाजत आहे. या योजनेवरून, पवारांच्या घरात एखादी लाडकी बहीण आहे का, असा प्रश्न करण्यात आला. यावर उत्तर देताना अजित पवार Ajit Pawar म्हणाले, माझ्या सगळ्या बहिणी लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालत असते. मात्र राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवायचे असते. राजकारण घरात येऊ द्यायचे नसते.

मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली. मी माझी बहीण सुप्रिया सुळे Supriya Sule यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे करायला नको होते. पण त्यावेळी उभे केले गेले. पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय झाला होता. एकदा बाण सुटला तो सुटला. पण आज माझे मन मला सांगते, की ते घडायला नको होते, अशी स्पष्ट मतही अजितदादांनी व्यक्त केले.

दरम्यान, बारामती लोकसभा निवडणुकीत झालेल्या नणंद-भावजय लढतीत सुप्रिया सुळेंनी विजय मिळवला. त्यांना सर्व विधानसभा मतदारसंघातून लिड मिळाले. या पराभवाची जबाबदारी नेता म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वीकारली.

आता राज्यभर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यासाठी अजिदादांनी राज्यभर जनसन्मान यात्रा सुरू केलेली आहे. यातच त्यांनी लोकसभेत बहीण सुप्रिया सुळे आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत व्हायला नको होती, अशी खंत व्यक्त केली आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT