Raosaheb Danve : फुलंब्री विधानसभेची सूत्र रावसाहेब दानवेंच्या हाती..?

Phulambri Vidhan Sabha Constituency : भाजपकडून फुलंब्री मतदारसंघातून लढण्यास इच्छुक रावसाहेब दानवेंच्या आवतीभोवती फिरतात.
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Political News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीचे विधानसभेचे आमदार तथा भाजपचे नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी वर्णी लागली आहे.

त्यानंतर फुलंब्री विधानसभा मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे फुलंब्री विधानसभेचे पूर्ण सूत्र रावसाहेब दानवेंकडे असल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

हरिभाऊ बागडे Haribhau Bagade राज्यपाल म्हणून राजस्थानला गेल्याने भाजपची कमांड रावसाहेब दानवेनी हातात घेतली असल्याचे चित्र मतदारसंघात आहे. ते फुलंब्रीतील एकापाठोपाठ एक होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.

विशेष म्हणजे प्रत्येक भेटीत पत्रकारांशी थेट संवाद साधू लागले आहे. यातूनच बागडेंनतर दानवे येथील सर्वसर्वा बनल्याचे बोलले जात आहे. यातूनच भाजपकडून फुलंब्री विधानसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार रावसाहेब दानवे सावली बनून मतदारसंघात वावरताना दिसून येत आहे.

Raosaheb Danve
Devendra Fadnavis : 'लाडक्या बहि‍णींचा देवाभाऊ' साधणार राखी पौर्णिमेनिमित्त महिलांशी थेट संवाद

फुलंब्री शहरात मंगळवारी भाजपच्या वतीने आळंदपासून ते फुलंब्रीपर्यंत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे नेतृत्व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे Raosaheb Danve यांनी केले. रावसाहेब दानवे येणार म्हणल्यावर सर्वच इच्छुकांनी सकाळीच आळंद येथे तिरंगा रॅलीसाठी गर्दी केली होती.

यात अनुराधा चव्हाण, सुहास शिरसाठ, राधाकिसन पठाडे, रामूकाका शेळके, प्रदीप पाटील, विजय औताडे, बापू घडामोडे यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. त्यांनी दानवेंची आवर्जून भेट घेतली. त्यामुळे फुलंब्री विधानसभेत आता हरिभाऊ बागडे यांच्यानंतर थेट रावसाहेब दानवेंनी सूत्र हाती घेतले असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Raosaheb Danve
Pune MNS Protest : मंगलाष्टका म्हणत मनसेनं लावलं उपायुक्तांच्या दालनातच लग्न; काय आहे कारण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com